शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा रस्ता रुंदीकरणाची कारवाई सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:42 IST

दिवा प्रभाग समिती हद्दीतील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेने अखेर सुरु केले आहे. या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या १९० कुटुंबांचे पुनर्वसनसुध्दा दोस्ती रेंटलच्या घरात केले जाणार आहे.

ठळक मुद्देवाहतुक कोंडीतून होणार सुटकारस्ता दोन्ही बाजूला ६० मीटरचा होणार

ठाणे -मागील काही महिने थांबलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई बुधवार पासून पुन्हा एकदा सुरु झाली आहे. दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बुधवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सुरु झाले. या ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु यामुळे येत्या काही दिवसात हा रस्ता दोन्ही बाजूला ६० मीटरचा होणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे. या ४ किमीच्या मार्गावरील १९० कुटुंबांचे पुनर्वसन बाजूलाच असलेल्या दोस्तीच्या रेंटलच्या घरांमध्ये करण्यात आले आहे.                                     बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून येथील रस्त्याच्या दुतर्फा ही कारवाई पोलीस बंदोबस्तात सुरु झाली. यावेळी आयुक्तांसमवेत अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले, उपायुक्त संदीप माळवी आदींसह इतर पालिकेचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. वाय जंक्शन ते कल्याणफाटा हा सुमारे ४ किमीचा रस्ता आहे. परंतु सध्या या रस्त्याच्या दुतर्फा वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसात याठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य वाहतुक कोंडी लक्षात घेऊन ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या हा रस्ता २५ ते ३० मीटरच्या आसपास आहे. परंतु रुंदीकरणानंतर हा रस्ता ६० मीटरचा होणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेली तळ अधिक चार ते सात मजल्याच्या ६ इमारती, ३० बांधकामे, भारत गिअर कंपनीचा गेट, २० ते २५ गॅरेजवाले व इतर व्यावसायिक आदींवर यावेळी हातोडा टाकण्यात आला. तर या भागातील १९० कुटुंबांचे जवळील दोस्तीच्या रेंटलच्या घरात केले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण जरी पालिका करणार असली तरी रस्त्याचे काम हे एमएमआरडीए मार्फतचे केले जाणार आहे.चौकट - ऐरोली ते काटई नाका पर्यंतच्या होऊ घातलेल्या उन्नती मार्गातील ६० मीटरचा भाग हा येथूनच जात आहे. परंतु आता येथील रहिवाशांची चर्चा झाली असून त्यांनी जमीन हस्तांतरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता हा मोठा प्रश्न सुध्दा सुटणार असल्याचा आशावाद यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाmmrdaएमएमआरडीए