शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशनसाठी लागणा-या अवैध धागा उत्पादनावर भिवंडीत केंद्रीय औषध विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:33 IST

भिवंडी : शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णांची जखम शिवण्यासाठी(टाके घालण्यासाठी) लागणा-या धाग्यांचे अवैधपणे उत्पादन करणा-या कंपनीवर केंद्रीय अन्न व औषधे विभागाने छापा टाकून कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.तालुक्यातील सावंदे गावात साईनाथ कंपाऊण्डमध्ये यंत्रमाग कारखान्याच्या गाळ्यात ही कंपनी सुरू केली होती. त्यामध्ये केंद्रीय अन्न व औषध विभागाचे अधिकारी डॉ.विजयसिंग करवासरा यांनी छापा टाकला ...

ठळक मुद्देटाके घालण्यासाठी लागणा-या धाग्यांचे भिवंडीत अवैध उत्पादनकेंद्रीय औषधे विभागाची कारवाईअवैधरित्या उत्पादन करणारे चार आरोपी फरार

भिवंडी : शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णांची जखम शिवण्यासाठी(टाके घालण्यासाठी) लागणा-या धाग्यांचे अवैधपणे उत्पादन करणा-या कंपनीवर केंद्रीय अन्न व औषधे विभागाने छापा टाकून कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.तालुक्यातील सावंदे गावात साईनाथ कंपाऊण्डमध्ये यंत्रमाग कारखान्याच्या गाळ्यात ही कंपनी सुरू केली होती. त्यामध्ये केंद्रीय अन्न व औषध विभागाचे अधिकारी डॉ.विजयसिंग करवासरा यांनी छापा टाकला असता देवनारच्या कत्तलखान्यातून मेलेल्या जनावराच्या आतड्यापासून धागा बनविण्याची धोकादायक प्रक्रिया सुरू होती. मेलेल्या जनावरांच्या आतड्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता त्यास मिठात जतन करून त्यास स्लायशिंग मशीनने कापून त्यावर टष्ट्वीस्टींग करून ते धागे वाळविले जात होते. तसेच त्या धाग्यांना ग्रायडरच्या सहाय्याने पॉलिश करून क्रोमिस्क सोल्युशनमध्ये रंग देऊन ते प्लास्टिकच्या पिशवीत सिलबंद केले जात होते.  त्याची शहरात व शहराबाहेरील खाजगी रूग्णालयांत विक्री करीत होते.या धाग्यांना रासायनिक प्रक्रीयेव्दारे न बनविल्याने ते धोकादायक आहे. तसेच हे उत्पादन औषधांच्या (मेडीसिन) कार्यकक्षेत येत असल्याने त्याची शासनाच्या संबधित विभागाकडून अधिकृत मान्यता न घेता उत्पादन व विक्री केल्याने रूग्णांना धोकादायक आहे,अशी माहिती केंद्राच्या औषधे प्रशासनाच्या अधिका-यांनी दिली.या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एजाज अहमद अफसर, इम्तियाज अब्बास अहमद शेख, सरफराज अहमद अबझार अहमद (धारावी,मुंबई) मोहमंद झीशान निसार अहमद मवाई (कुंदा प्रतापगड, उत्तरप्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन हे आरोपी फरार झाल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी दिली. तसेच केंद्रीय औषधे प्रशासनाच्या सुचनेनुसार पोलीसांनी ही कंपनी आंतील मशीनरी व धाग्यांच्या बंडलासह सील केली आहे. मात्र ही कंपनी किती दिवसांपासून सुरू होती,या बाबत सांगण्यास नकार दिला.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा