शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या उपअभियंत्यावर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 22:39 IST

Thane Municipal Corporation : या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. 

ठळक मुद्देडॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्याला सर्वसाधारण सभेच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्याना तडकाफडकी निलंबित केले.

ठाणे :  ठाणे महापालिकेच्या महासभेत नाकारण्यात आलेले प्रस्ताव पुन्हा आर्थिक तरतुदीसाठी ठेवण्यात आल्याने पालिकेच्या रुपेश पाडगावकर या  उपभियंत्याला चांगलेच भोवले आहे. त्यामुळे या उपअभियंत्यावर ठाणे महापलिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. 

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागामध्ये उपअभियंता असलेल्या पाडगावकर यांच्याकडे बजेट व्यवस्थापनाचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून आर्थिक स्थितीप्रमाणे कामाचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, कामांची यादी तयार करून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. परंतु संबंधित उपअभियंत्यांनी या कामांव्यतिरिक्त इतर कामांना अर्थसंकल्पीय तरतुद केली.त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या अंमलबजावणीस अडथळा निर्माण झाला आहे. 

लोकप्रतिनिधींनीही त्याबद्दल संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. तर शुक्रवारच्या स्थायी समिती बैठकीमध्येही या संदर्भात चर्चेमध्ये संबंधित कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्याला सर्वसाधारण सभेच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्याना तडकाफडकी निलंबित केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका