दुकानांवर सायंकाळी ७ नंतर कारवाई सुरू; दुकाने रात्री १०पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 09:34 PM2020-10-03T21:34:44+5:302020-10-03T21:34:50+5:30

तर मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कारवाई करा. पण दुकानांची वेळ आता रात्री १० वाजेपर्यंत करून द्या, अशी मागणी केली जात आहे. 

Action started on shops after 7 pm; Seeking permission to keep shops open till 10 pm | दुकानांवर सायंकाळी ७ नंतर कारवाई सुरू; दुकाने रात्री १०पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगीची मागणी

दुकानांवर सायंकाळी ७ नंतर कारवाई सुरू; दुकाने रात्री १०पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगीची मागणी

Next

मीरा रोड - मीरा भाईंदरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी असल्याने त्यानंतर दुकाने सुरू दिसताच पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तर मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कारवाई करा. पण दुकानांची वेळ आता रात्री १० वाजेपर्यंत करून द्या, अशी मागणी केली जात आहे. 

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा कहर कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. २ ऑक्टोबरपर्यंत मीरा भाईंदरमध्ये कोरोनामुळे ५८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १८ हजार ८७० इतके कोरोनाचे रुग्ण झाले असून, त्या पैकी १६ हजार ३०४ रुग्ण बरे झाले आहेत. १ हजार ९८६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

एकीकडे अनलॉकमुळे शहरातील व्यवहार सुरू झालेले असल्याने लोकांची गर्दी वाढत आहे. त्यातच मास्क घालायचा नाही वा अर्धवट दिखाव्याला घालायचा, गर्दी करून सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन सर्रास सुरू आहे. जेणेकरून कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने ही सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड ह्यांनी परवानगी दिली होती. दुकानदारांनी तसेच ग्राहकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे बंधनकारक करत उल्लंघन केल्यास दंड आकारणीचा इशारा दिला होता . 

परंतु शहरात सायंकाळी ७ नंतरदेखील अनेक जण दुकाने उघडी ठेवत आहेत. काही जण अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करत. जेणेकरून सायंकाळी ७ नंतर देखील गर्दी होत असल्याने अखेर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या शोरूमसह दुकानदारांवर २ हजार रुपये दंड आकारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. दुकानदार वाद घालतात म्हणून सोबत पोलीस कर्मचारीदेखील असतात. 

तर दुकानांची वेळ आता सायंकाळी ७ ऐवजी रात्री १० पर्यंत वाढवून द्या, अशी मागणी भाजपा नगरसेवक एड रवी व्याससह दुकानदारांनी चालवली आहे. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असून वेळ वाढवून दिल्यास दिलासा मिळेल असे व्यास म्हणाले. मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून जरूर कठोर कारवाई करा, पण दुकानाची वेळ वाढवून द्या अशी मागणी होत आहे. 

Web Title: Action started on shops after 7 pm; Seeking permission to keep shops open till 10 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.