शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई; रहिवाशांचा आंदोलनाचा प्रयत्न

By अजित मांडके | Updated: August 25, 2023 18:14 IST

कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे.

ठाणे: कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. गुरुवारी ६५ झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी देखील सांयकाळ पर्यंत ५५ ते ६० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु शुक्रवारी याठिकाणी राजकीय मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यातही ही कारवाई टाळण्यासाठी येथील रहिवाशांनी आंदोलन देखील केले. मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरुच होती. त्यानंतर येथील रहिवाशांनी पुनर्वसन मागणी करीत पुलाखालीच आपला संसार थाटला आहे.

ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून सध्या ही कारवाई सुरु आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुरु झालेली कारवाई सांयकाळी थांबविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बुल्डोजर फिरविला गेला. यावेळी रहिवाशांना आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न पालिकेने पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला. तर शुक्रवारी जवळ जवळ सर्वच पक्षाच्या मंडळींनी येथे हजेरी लावून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानंतरही ही कारवाई सुरुच होती. अखेर सांयकाळ पर्यंत पुन्हा ५५ ते ६० झोडपड्यांवर कारवाई करण्यात आली.

पुन्हा बांधकाम होऊ नये म्हणून खणला खड्डायापूर्वी देखील महापालिकेच्या माध्यमातून या भागात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा बांधकाम होतांना दिसून आले. परंतु शुक्रवारी कारवाई करतांना महापालिकेने थेट पोकलेनच खाली उतरला आणि बांबू काढतांना त्याठिकाणी खड्डा खणला. काही ठिकाणी अशाच पध्दतीने खड्डा खणल्याचे दिसून आले. त्यात खाडीचे पाणी जाऊन साचू लागले आहे. केवळ याठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये यासाठीच ही शक्कल लढविण्याचे दिसून आले.

पुलाखालीच थाटला संसारमहापालिकेने कारवाई केल्यानंतर येथील रहिवाशांना आपल्या मुलाबाळांसह येथील पुलाखालीच संसार थाटल्याचे दिसून आले. पुनर्वसनाची मागणी करीत हे रहिवासी आक्रमक झाले होते. त्यातही ज्या काही झोपड्यांवर कारवाई झाली, त्यातील काही झोपड्यांच्या ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा देखील बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

१४० रहिवाशांच्या पुर्नवसनासाठी आग्रहीखाडीत झोपड्या बांधल्या गेल्या असल्या तरी येथील १४० रहिवासी हे २०११ पासून याठिकाणी वास्तव्यास असल्याने मानवतेच्या दृष्टीकोणातून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी राजकीय मंडळींनी केली आहे. त्यानुसार त्यांचे तात्पुरत्या स्वरुपात रेंटलच्या घरात आणि नंतर हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याची तयारी देखील सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे