शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई, केडीएमसीची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 07:24 IST

लॉकडाऊनमध्ये ही मोहीम राबवू नये, असे अनेक नगरसेवकांचे म्हणणे होते. मात्र, कोकरे ठाम होते. प्रमुख ठिकाणच्या कचराकुंड्या त्यांनी हटवल्या.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत रस्त्यावर कचरा टाकल्यास २०० ते तीन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेंतर्गत ही कारवाई तीव्र केली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे.लॉकडाऊनमध्ये ही मोहीम राबवू नये, असे अनेक नगरसेवकांचे म्हणणे होते. मात्र, कोकरे ठाम होते. प्रमुख ठिकाणच्या कचराकुंड्या त्यांनी हटवल्या. नागरिकांना घंटागाड्यांची वेळ कळवण्याबरोबरच प्रभागांमध्ये त्यांनी स्वत: शून्य कचरा मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. परंतु, आजही रस्त्यावर कचरा टाकला जात आहे.कचरा कुठेही टाकणाऱ्यांविरोधात महापालिकेने यापूर्वी कारवाई केली आहे. हीच कारवाई आता गतिमान केली जाणार आहे. त्यासाठी बुधवारी स्वच्छता बीटमार्शल यांची संयुक्त बैठक कोकरे यांनी घेतली. यावेळी त्यांनी नागरिक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात योग्य कारवाई केली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा संघर्ष होता कामा नये, असे बजावले. त्यानुसार, हे मार्शल गुरुवारपासून रस्त्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्यांना २०० ते तीन हजार रुपये दंड आकारणार आहेत.दरम्यान, स्वच्छता बीटमार्शल यांना कोरोनाकाळात उपनगरांतून कल्याण-डोंबिवलीत येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांची उपस्थिती कमी झाली होती. आता अनलॉकमध्ये रस्ते वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे ५० बीटमार्शल कल्याणच्या विभागासाठी काम करणार आहेत. हे मार्शल एका खाजगी एजन्सीद्वारे नेमले आहेत. ते जितकी दंडात्मक कारवाई करतील, त्यातील ६३ टक्के रक्कम ही महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. तर, ३७ टक्के रक्कम ही बीटमार्शलच्या पगारावर खर्च केली जाणार आहे.आधारवाडी डम्पिंगवर दररोज ४०० टन कचराशून्य कचरा मोहिमेमुळे आधारवाडी डम्पिंगवर कचरा कमी झाला आहे. लॉकडाऊनकाळात तो आणखी कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा अनलॉकमध्ये कचरा वाढला आहे. अगोदर डम्पिंगवर दररोज ६०० मेट्रीक टन कचरा जात होता. आता त्यात २०० मेट्रीक टनची घट झाल्याने डम्पिंगवर आता केवळ ४०० मेट्रीक टन कचरा टाकला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका