शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उंभार्लीतील ३७४ अतिक्रमणांवर वनविभागाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:07 IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात वन विभागाने धडक कारवाई करून तीन हेक्टरवरील ३७४ अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडली.

ठाणे / टिटवाळा : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्याणी, मौजे उंभार्ली परिसरात वन विभागाने धडक कारवाई करून तीन हेक्टरवरील ३७४ अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडली. कल्याण परिसरासह अंबरनाथजवळील शेकडो एकरवरील वृक्षलागवडीस आग लावल्याच्या दुर्दैवी घटना नुकत्याच घडल्या आहेत. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेसह निष्काळजीपणावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने त्यांच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईस प्रारंभ केल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.या धडक कारवाईस अनुसरून आमच्या टिटवाळा वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामगावकर यांनी कल्याण परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांना २६ नोव्हेंबर रोजी आदेश देऊन दोन दिवसांच्या आत घरे खाली करण्याची नोटीस बचावली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी वाघेरे यांनी तीन अधिकारी, वीस एसआरपी व २५० कर्मचारी, चार जेसीबी व एक पोकलेन असा भलामोठा फौज फाटा घेऊन उंभार्ली येथील वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली.या कारवाईमुळे संबंधित कुटूंबांवर बेघर होण्याचा प्रसंग ओढवला आहे. वरिष्ठांच्या आदेशाने तालुक्यातील सर्वच वनजमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाई करून त्या खुल्या करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगितले जात आहे. मुरबाडचे सहायक वनसंरक्षक हिरवे, भामरे, कल्पना वाघेरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम पार पडली. या कारवाईमुळे वनक्षेत्रात वणवा पेटवण्याच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तविली जातेय.>वन विभागाच्या २८ ए या संरक्षित जागेवरील अतिक्र मण केलेली ३७४ बांधकामे पाडून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दोन दिवसांपासून शीळफाटाजवळील वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे, शेड्स आदी जमीनदोस्त करण्यात आली. याप्रमाणेच शुक्रवारी उंभार्ली परिसरातही धडक कारवाई केली. यासाठी पोलीस फौजफाटा तसेच शंभरावर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले. यामध्ये चाळी, दुकाने, शेड्स यांचा समावेश आहे. यावेळी सुमारे तीन हेक्टर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला.