शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय मृत्यूप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई: दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 08:37 IST

मुख्यमंत्री ठाण्यात राहतात परिणामी आरोग्य सेवा पुरवणे त्यांचे कर्तव्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची कारणे वेगवेगळी आहेत. परंतु रुग्णालयातील मृत्यूचा रेशो हा ४.५ टक्के एवढा आहे. असे असतानाही जे १८ मृत्यू झालेले आहेत, ते मृत्यूच्या रेशोपेक्षा अधिक असल्याने चौकशीसाठी उच्च समिती नेमण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली. 

केसरकर पुढे म्हणाले की, मृत्यू नैसर्गिक झाले असतील, तर त्यांना मदत देता येणार नाही. परंतु यंत्रणेच्या चुकीमुळे मृत्यू झाले असतील, तर त्यांना मदत देता येणे शक्य आहे. चौकशीत यंत्रणांची चूक निदर्शनास आल्यास दोषी असणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

रुग्णालयात ५०० बेडची क्षमता असताना या ठिकाणी सद्य:स्थितीत ५६६ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा ताण वाढला, परंतु तिकडे सिव्हिल रुग्णालयात १८६ बेड रिक्त असल्याचेही केसरकरांनी सांगितले. रुग्णांची परवड होणार नाही, यादृष्टीने ट्रस्टच्या रुग्णालयांतील बेडची माहिती यापुढे रुग्णांना दिली जाणार असून जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनाही सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मृत्यूला सरकारच जबाबदार - खा. विचारे

कोविड  काळात कसलीच कमतरता नव्हती, मात्र आता लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे, अशी टीका ठाण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बाेलत हाेते. मुख्यमंत्री ठाण्यात राहतात परिणामी आरोग्य सेवा पुरवणे त्यांचे कर्तव्य आहे. या १८ जणांच्या मृत्यूची  सर्वस्वी जबाबदारी सरकारची असल्याचेही ते म्हणाले.

जबाबदारी निश्चित करावी : घाडीगावकर

शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या कळवा रुग्णालयात महापालिका सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. रुग्णालयासाठी वारंवार दुरुस्ती व इतर सामग्रीसाठी  पाच वर्षांत देयक काढले आहे, हे पाहता महापालिका आयुक्त यांच्यावर खरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :kalwaकळवाDeepak Kesarkarदीपक केसरकर