शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

कुख्यात गँगस्टर पुजारी टोळीच्या हस्तकांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:15 IST

कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीची दहशत पसरविण्यासाठी भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये जाऊन रिसेप्शनिस्टवर गोळीबार करणाऱ्या आरोपींविरुद्ध आता मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीची दहशत पसरविण्यासाठी भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये जाऊन रिसेप्शनिस्टवर गोळीबार करणाऱ्या आरोपींविरुद्ध आता मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी या प्रकरणातील चारही आरोपींचा पुन्हा ताबा घेतला.मुंबई पोलिसांनी १९ जानेवारी रोजी कल्याणमधील चिंचपाडा येथील हरिश कृष्णाप्पा कोटीयन उर्फ कुमार, रत्नागिरी येथील अनिकेत किशोर ठाकूर उर्फ अन्नू, डोंबिवली येथील संकेत उदय दळवी उर्फ सॅण्डी आणि प्रथमेश शिवराम कदम उर्फ भाया यांना एका गुन्ह्यामध्ये अटक केली होती. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने १५ फेब्रुवारी रोजी त्यांना स्वत:च्या ताब्यात घेतले. आरोपींची कार्यपद्धती संघटित गुन्हेगारीप्रमाणेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मकोका कायद्यान्वये कारवाई प्रस्तावित होती. अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर मकोका अंतर्गत कारवाई करून आरोपींचा ताबा खंडणीविरोधी पथकाने घेतला. मंगळवारी त्यांना ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयासमोर हजर केले गेले.सुरेश पुजारीच्या अनेक टोळ्या पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सक्रिय आहेत. नोव्हेंबर २०१७ मध्ये कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना पुजारीने ५० लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची उकल खंडणीविरोधी पथकाने आरोपींच्या चौकशीतून केली होती. आता आरोपींची नव्याने पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांचे वेगवेगळ्या शहरांमधील साथीदार, त्यांची कार्यपद्धती आणि इतर मुद्यांवर चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा