शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मांगले दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध मकोका’खाली कारवाई; मोपलवारांना रवी पुजारी टोळीची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 21:46 IST

मांगले दाम्पत्यासह गँगस्टर रवी पुजारी टोळीविरुद्ध ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. मांगलेविरुद्ध दाखल केलेली खंडणीची तक्रार मागे घेण्यासाठी रवी पुजारी टोळीकडून ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे: मांगले दाम्पत्यासह गँगस्टर रवी पुजारी टोळीविरुद्ध ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. मांगलेविरुद्ध दाखल केलेली खंडणीची तक्रार मागे घेण्यासाठी रवी पुजारी टोळीकडून ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.मोपलवार यांच्याकडून सात कोटींची खंडणी मागणा-या सतीश मांगले आणि त्याची दुसरी पत्नी श्रद्धा यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने ३ नोव्हेंबर रोजी अटक केली. याच प्रकरणात त्यांचा आणखी एक साथीदार भरत तावडे आणि अनिल वेदमेहत याच्याविरुद्धही सबळ पुरावा मिळाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली आहे. मोपलवार यांना १२ नोव्हेंबर रोजी पुजारी याने फोनवरुन धमकी दिली. ‘‘तुने तो संतोष मांगले को फसाया, कोर्ट में जाके अ‍ॅफीडेव्हिट कर की, मांगले का इस केसमें कोई हाथ नहीं है, और केस पीछे ले,और वो सात करोड रु पये का क्या हुआ, वो दे देना...मैं कौन बात कर रहा हूं, मालूम है ना? मैं रवी पुजारी बात कर रहा हूॅँ ....’’ असा धमकीचा फोन मोपलवार यांना विदेशातून आला आहे. या फोनमुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले असून मांगले आणि रवी पुजारी गँगचा नेमकी काय संबंध आहे, याचीही चौकशी करण्यात येत आहे.पुजारीच्या नावे फोन करणा-याने मांगले विरुद्धची तक्रार मागे घेण्यास सांगून मोपलवार यांच्याकडे सात कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी न दिल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मांगलेदाम्पत्यासह वेदमेहता, भरत तावडे आणि रवी पुजारी या पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत (मकोका) कारवाई केल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा