शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अभिनय कट्ट्यावर वि.वा.शिरवाडकर लिखित नाटक बसते आहे एकांकिकेची धम्माल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 17:05 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर नाटक बसते आहे एकांकिका सादर करण्यात आली. 

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर वि.वा.शिरवाडकर लिखित नाटक बसते आहे एकांकिकेची धम्माल कट्टा क्रमांक ४५४ वर एक धम्माल विनोदी पुष्प सादरअभिनय कट्ट्याचा कलाकार प्रत्येक आव्हान लीलया झेलू शकतो : किरण नाकती

ठाणे :  कुसुमाग्रज म्हणजेच आपले लाडके वि.व.शिरवाडकर आपल्या मराठी साहित्यातील एक महामेरू. यांच्या लेखणीतून अवतरलेल्या नाटक बसते आहे ह्या एकांकिकेचे अभिनय कट्ट्यावर धम्माल सादरीकरण झाले.

    विक्रमी ५०० व्या कट्ट्याचे वेध लागलेल्या अभिनय कट्ट्याने कट्टा क्रमांक ४५४ वर एक धम्माल विनोदी पुष्प सादर केलेलं.प्रत्येक रविवार आपल्या कलाकृतींचे सादरीकरण करून रसिक मायबाप प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणे हाच अभिनय कट्ट्याचा ध्यास आहे आणि ह्या विक्रमी प्रवासातील आणखी एक पाऊल म्हणजे कट्टा क्रमांक ४५४ वर अभिनय कट्ट्यावरील बालसंस्कार शास्त्रातील कलाकारांनी सादर केलेले वि.वा.शिरवाडकर लिखित किरण नाकती दिग्दर्शित 'नाटक बसते आहे'. एखाद नाटक बसवताना कलाकार रंगमंच व्यवस्था लेखक दिग्दर्शक निर्माते ह्यांच्यातील गोंधळा मध्ये नाटक बसता बसता कस कोलमडत आणि व्यावसायिकिकरणाच्या नावाखाली संहितेचा बट्ट्याबोळ होतो ह्याची रंगतदार हसत खेळत मांडलेलं नाट्य म्हणजे नाटक बसते आहे.सादर नाटकात श्रेयस साळुंखे (दिग्दर्शक),अद्वैत मापगावकर(सहादू),आदित्य भोईर(पेंटर मास्टर),प्रथम नाईक(बाला शेठ), स्वस्तिका बेलवलकर (व्यवस्थापक),पूर्वा तटकरे (चमेली बाई), वैष्णवी चेऊलकर(लेखिका),चिन्मय मोर्ये (मावशी) सहदेव साळकर(नानशेठ) आणि रुचिता भालेराव(सूत्रधार) ह्यांनी भूमिका साकारल्या.प्रकाशयोजना आणि संगीत ह्यांची जबाबदारी आदित्य नाकती, नेपथ्य परेश दळवी आणि रंगभूषा दीपक वाडेकर ह्यांनी सांभाळले.नाटक हसते आहे ने उपस्थित प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले. बालकलाकारांनी ज्या पद्धतीने वि वा शिरवाडकर यांच्या संहितेला आपल्या अभिनय कौशल्याने न्याय द्यायचा प्रयत्न केला. खरंतर लहान मुलांनी हे नाटक सादर करणे खरच आव्हानात्मक पण अभिनय कट्ट्याचे बालकलाकारांनी ते सादर करून अभिनय कट्ट्याचा कलाकार प्रत्येक आव्हान लीलया झेलू शकतो हे सिद्ध केलं असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी मत व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक