शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीतील तस्कराला हैद्राबाद येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 22:21 IST

वन्य प्राणी तसेच पक्षांची तस्करी करणा-या चार जणांच्या टोळीतील अब्दूल नबी उर्फ परवेज खान (रा. मिस्त्रीगंज, हैंद्राबाद) या मुख्य तस्कराला ठाणे वनविभागाने हैद्राबाद येथून नुकतीच अटक केली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये वनविभागाने वेगवेगळया प्रजातीचे ४७ पक्षी आणि सात वन्यप्राणी या आरोपींकडून जप्त केले आहेत.

ठळक मुद्देठाणे वनविभागाची कारवाई सात मुनिया पक्षी आणि १६ सुगरण पक्षी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रेल्वेने वन्य प्राणी तसेच पक्षांची तस्करी करणा-या चार जणांच्या टोळीतील अब्दूल नबी उर्फ परवेज खान (रा. मिस्त्रीगंज, हैंद्राबाद) या मुख्य तस्कराला ठाणेवनविभागाने हैद्राबाद येथून नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून ठिपकेदार सात मुनिया पक्षी तर १६ सुगरण पक्षांची सुटका करण्यात आली आहे. त्याला २१ डिसेंबरपर्यंत वन विभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण रेल्वे न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत. याआधी त्याच्या दोन साथीदारांना ठाणे वनविभागानेअटक केली आहे.रेल्वेने वन्य पक्षी तसेच प्राण्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ठाणे रेल्वे स्थानकातून १० डिसेंबर २०१९ रोजी आर. के. मोहम्मद खलील रियाज अहमद (२४, रा. बैंगलोर, कर्नाटक) याला ताब्यात घेतले होते. त्याच्या ताब्यातून एक घार, तीन शिक्रा, तुरे असलेले एक घुबड आणि एक विदेशी घोरपड असे पाच वन्य जीव ताब्यात घेण्यात आले. त्याला १८ डिसेंबरपर्यंत वन विभागाची कोठडी न्यायालयाने दिली होती. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले पक्षी हे हैद्राबाद येथून खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली. त्यातील काही पक्षी हे मुंबई येथील शाहरुख खान (रा. भायखळा) आणि किशन रामपाल (रा.मुंबई) यांना तो विक्री करणार होता. त्याच माहितीच्या आधारे शाहरुखला १२ डिसेंबर रोजी तर किशनला १४ डिसेंबर रोजी भायखळा भागातून अटक करण्यात आली. किसन याच्याकडून दोन जांभळया रंगाचे पोपट जप्त करण्यात आले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनाही १६ डिसंबरपर्यंत वन विभागाची कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. दरम्यान, वरील आरोपींच्या चौकशीतूनच १७ डिसेंबर रोजी ठाण्याचे उप वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वन संरक्षक बी. टी. कोळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनक्षेत्रपाल मनोज परदेशी, वनपाल संजय पवार आणि वनरक्षक प्रविण आव्हाड यांनी हैद्राबाद येथून मुख्य आरोपी शेख अब्दूल नबी उर्फ परवेज खान याला १७ डिसेंबर रोजी पक्षी विक्री करण्याच्या दुकानातून सात ठिपकेदार मुनिया पक्षी आणि १६ सुगरण पक्षी अशा २३ पक्षांसह अटक केली.या संपूर्ण कारवाईमध्ये वनविभागाने वेगवेगळया प्रजातीचे ४७ पक्षी आणि सात वन्यप्राणी या आरोपींकडून जप्त केले आहेत. सर्व वन्यप्राणी तसेच पक्षांना त्यांच्या नैसिर्गक अधिवासात निसर्ग मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वन्यजीव विषयक कोणतीही तक्र ार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे वनविभागाने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभागArrestअटक