शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

खूनी हल्ल्यासाठी पिस्टल पुरविणाऱ्या आरोपीला सात पिस्टलसह ठाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 8:17 PM

उल्हासनगर परिसरातील एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयात वॉन्टेड असलेल्या कैलाससिंग चावला (२७, रा. गांधवानी, मध्यप्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. सखोल चौकशीमध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एक वर्षांपूर्वी दाखल असलेल्या एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयातील आरोपीला त्याने पिस्टल पुरविल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देदोन मॅगझीन आणि २० जिवंत काडतुसेही हस्तगतठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उल्हासनगर परिसरातील एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयात वॉन्टेड असलेल्या कैलाससिंग चावला (२७, रा. गांधवानी, मध्यप्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी अटक केली. त्याच्याकडून सात माऊजर पिस्टल, दोन मॅगझीन आणि २० जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.ठाण्यातील साकेत येथील महालक्ष्मी मंदिराच्याजवळ कैलाससिंग हा गावठी बनावटीच्या माऊजर पिस्टल तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव, संदीप चव्हाण आणि उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने १४ फेब्रुवारी २०२१ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पिस्टल विक्रीसाठी आलेल्या कैलाससिंग याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेच्या झडतीमध्ये सात माऊजर पिस्टलसह एक लाख ८८ हजार ७५० रुपयांची शस्त्रसामुग्री हस्तगत केली. त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ३७-१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याला १९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. सखोल चौकशीमध्ये विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एक वर्षांपूर्वी दाखल असलेल्या एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयातील आरोपीला त्याने पिस्टल पुरविल्याचे उघड झाले. यात तो गेल्या अनेक दिवसांपासून वॉन्टेड होता. त्याला विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक