शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लुटमारीतील आरोपीने केले स्वत:च्याच गळयावर काचेच्या तुकडयाने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:04 IST

मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी लुटमारीच्या गुन्हयात अटक केल्यानंतर तपासासाठी मुंब्रा येथील घरी आणलेल्या कामरान रईस सिद्दीकी (२९) या आरोपीने स्वच्छतागृहात जाऊन स्वत:च्या गळयावर काचेच्या तुकडयाने प्रहार केल्याची घटना नुकतीच घडली.

ठळक मुद्देमुंबईच्या पायधुनी पोलिसांनी केली होती अटक मुंब्रा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी लुटमारीच्या गुन्हयात अटक केल्यानंतर तपासासाठी मुंब्रा येथील घरी आणलेल्या कामरान रईस सिद्दीकी (२९) या आरोपीने स्वच्छतागृहात जाऊन स्वत:च्या गळयावर काचेच्या तुकडयाने प्रहार केल्याची घटना नुकतीच घडली. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कामरान याला पायधुनी पोलिसांनी एका लुटमारीच्या गुन्हयात मुंबईतून अटक केली होती. पायधुनी पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी २४ जानेवारी रोजी दुपारी १वाजण्याच्या सुमारास त्याला तपासासाठी मुंब्रा येथील त्याच्या घरी नेले होते. याच संदर्भात घरात झडती आणि चौकशी सुरु असतांना लघुशंकेला जाण्याचा बहाणा करीत तो घरातील स्वच्छतागृहामध्ये गेला. त्याने आतून दार बंद केले होते. बराच वेळ होऊनही कामरान बाहेर न आल्यामुळे पायधुनी पोलिसांच्या पथकाने त्याला आवाज दिला. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी त्याच्या स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला. तेंव्हा तो आत जखमी अस्वस्थेमध्ये पडलेला आढळला. त्याच्या गळयाभोवती कापल्याच्या गंभीर जखमा होत्या. पोलिसांनी तातडीने त्याला एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कामरान विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.* कामरान याने त्याच्या एका साथीदारासह जबरी चोरीचा बनाव केला होता. याच लुटीतील रक्कम त्याच्या घरातून जप्त करण्यासासाठी मुंबई पोलीस त्याच्यासह घरी गेले होते. आता या सर्व प्रकारातून कुटूंबीयांना नाहक त्रास होईल, म्हणून आपण हे कृत्य केल्याचे कामरान याने मुंब्रा पोलिसांना सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक