शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Updated: December 9, 2025 00:08 IST

आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे: अवघ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला गराेदर करणाऱ्या साहीद माेहमद हासमी (३०, रा. काशीगाव, जि. ठाणे) याला २० वर्षे सश्रम कारावासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्षांच्या साध्या कैदेचीही शिक्षा आराेपीला भाेगावी लागणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी साेमवारी दिली. 

भाईंदरमधील काशीगावात पिडितेची आई एका कंपनीत कामाला हाेती. तिला जेवणाचा डबा देण्यासाठी पिडिता मे २०२१ मध्ये गेली हाेती. त्यावेळी ती घरी परत येताना ओळखीचा असलेल्या आराेपीने तिला त्याच्या माेटारसायकलीवरुन साेडविले हाेते. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी त्याने तिला घरी साेडवितांना त्याच्या घरी नेले. त्यावेळी त्याने घराचा दरवाजा लावून तिच्यावर दाेन वेळा  जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याची वाच्यता केल्यास चाकूने तिचा गळा कापण्याचीही त्याने धमकी दिली. यातूनच ती तीन महिन्यांची गराेदर राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. याप्रकरणी काशीमीरा पाेलीस ठाण्यात विवाहित असलेल्या आराेपी साहीद याच्याविरुद्ध पिडितेच्या आईने ६ ऑगस्ट २०२१ राेजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याला त्याच दिवशी पाेलिसांनी अटकही केली. याच खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात ५ डिसेंबर २०२५  राेजी झाली. जिल्हा सरकारी वकील संजय लाेंढे आणि सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आराेपीला शिक्षा हाेण्यासाठी जाेरदार बाजू मांडली. तर आराेपीची बाजू ॲड. बी. आर. बुखारी यांनी मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर आराेपीला लैंगिग अत्याचार आणि पाेस्काे अंतर्गतच्या कलमांखाली २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्या. देशमुख यांनी सुनावली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी