शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संचित रजेवर सुटल्यानंतर कारागृहातून पसार आरोपी उत्तरप्रदेशातून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:45 IST

ठाण्यातील एका खून प्रकरणामध्ये २१ वर्षांंपूर्वी अटक झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा झालेला अशोककुमार सिंग हा संचित रजेवर नाशिक कारागृहातून बाहेर आला होता. तो गेल्या १८ वर्षांपासून फरार होता.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई१८ वर्षांपासून होता फरारअटक करतांना स्थानिकांनी केला विरोध

ठाणे : एका खून प्रकरणामध्ये १९९७ मध्ये (२१ वर्षांपूर्वी) जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर सुटल्यानंतर पसार झालेल्या अशोककुमार सिंग याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने गुरुवारी उत्तरप्रदेशातून अटक केली. सुलतानपूर या त्याच्या मूळ गावातून पोलिसांनी त्याला उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.ठाण्याच्या करवालोनगर येथे ५ डिसेंबर १९९४ मध्ये डेनिस कम्पाउंडमधील रामनारायण सिंग यांच्याशी झालेल्या स्थावर मालमत्तेच्या वादातून प्रयागसिंग सिंग, वेदप्रकाश सिंग आणि अशोककुमार सिंग यांनी आपसात संगनमत करून धारधार शस्त्राने रामनारायण यांचा खून केला होता. याच गुन्ह्यात यातील तिन्ही आरोपींना १९९७ मध्ये ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजारांचा दंडाची तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा लागलेला अशोककुमार हा (बंदी क्र. सी/२९८४) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून संचित रजेवर बाहेर आला होता. तो २६ फेब्रुवारी २००० मध्ये कारागृहात पुन्हा हजर होणे अपेक्षित होते. मात्र, हजर होण्याऐवजी तो पसार झाला होता. त्याचा नाशिक, ठाणे आणि मुंबई पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही शोध घेण्यात येत होता. गेल्या १८ वर्षांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. तो पसार झाल्याचा गुन्हाही ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तो त्याच्या उत्तरप्रदेशातील सुलतानपूर या मूळगावी असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. बी. सरक, हवालदार आनंदा भिलारे, सुभाष मोरे, एस. पी. गायकवाड या पथकाने उत्तरप्रदेशातील टास्क फोर्स, लखनौ आणि स्थानिक देहात कोतवाली, सुलतानपूर या पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याला ६ डिसेंबर २०१८ रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतांना स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी करून त्याच्या अटकेला विरोध केला. मात्र, या विरोधाला न जुमानता ठाणे पोलिसांनी कौशल्याने त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली................

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून