शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या महापौरांना गँगस्टर दाऊदच्या नावाने धमकी देणा-याची मुंब्य्रातून धरपकड

By जितेंद्र कालेकर | Updated: September 19, 2019 23:27 IST

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना धमकी देणा-या दाऊदच्या कथित हस्तकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले आहे. त्याने ही धमकी नेमकी का दिली? त्याचा दाऊदचा नेमका काय संबंध आहे? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देअवघ्या ४८ तासात लागला तपासठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईएका महिलेच्या फोनवरुन देण्यात आली धमकी

ठाणे: ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुप्रसिद्ध गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर तसेच छोटा शकीलच्या नावाने उचलून नेण्याची धमकी देणा-या वासिम सादिक मुल्ला (रा. मुंब्रा) याला मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. तो दाऊदचा हस्तक आहे की नाही, याची मात्र खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.तुम्ही नीट राहिले नाही तर तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटूंबियांना त्रास देऊ, तुम्ही हिशोबात रहायचे’ असे आव्हान देतच एका अनोळखी व्यक्तीने १७ सप्टेंबर रोजी रात्री ११.१६ ते ११.५० वाजण्याच्या दरम्यान महापौर शिंदे यांना धमकी दिली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने या फोनचा मागोवा घेतला असता, तो मुंब्रा येथील एका महिलेच्या नावावर असल्याची बाब समोर आली. तिला चौकशीसाठी बोलविण्यात आले असता, हा फोन क्रमांक आपला असला तरी या धमकीबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तिने स्पष्ट केले. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वासिम मुल्ला याला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. धमकी देणारा हा खरोखर दाऊदचा हस्तक आहे की, तोतया हस्तकाने हा खोडसाळपणा केला, याबाबतही आता सखोल चौकशी करण्यात येत आहे. या वृत्तास पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनीही दुजोरा दिला असून अधिक तपशील देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर थेट महापौरांना असा धमकीचा फोन आल्याने पालिका वर्तुळातही दाऊद किंवा छोटा शकील यांच्या नावाने महापौरांना कोण धमकी देऊ शकते? असे तर्कवितर्क केले जात होते.खंडणी विरोधी पथकाचा दबदबा कायमपोलीस खात्याचा राजीनामा देऊन राजकारणात गेलेले प्रदीप शर्मा हे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख होते. त्यांनीच ठाण्यात पदभार घेतल्यानंतर दाऊदचा भाउ इकबाल कासकर याला दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात मुंबईतून अटक केली होती. याशिवाय, त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्हयांचा आपल्या अधिपत्याखालील अधिका-यांकडून मोठया कौशल्याने तपास केला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही क्लिष्ट गुन्हयांचा अल्पावधीत छडा लावण्याची हीच परंपरा त्यांच्या अधिपत्याखालील खंडणी विरोधी पथकाने कायम ठेवल्याचे महापौर धमकी प्रकरणाने अधोरेखित झाले आहे. शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर या पथकाची ही मोठी कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिका