शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खूनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा: संचित रजेतून पसार आरोपी १४ वर्षांनंतर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:21 IST

एका खूनाच्या गुन्हयात जन्मनेपेची शिक्षा झाल्यानंतर संचित रजेवरुन किशोर गायकवाड पसार झाला होता. त्यानंतर तो तो पनवेलच्या तहसिलदार कार्यालयात दलालीचे काम करीत होता. याच कार्यालयात एका नोंदीसाठी मंडल अधिकारी महेश भाट यांच्या वतीने दहा हजारांची लाच स्वीकारतांना त्याला अटक झाली होती.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई कळवा विटावा भागातून अटक मंडळ अधिकाऱ्याच्या वतीने नाव बदलून घेतली लाच

ठाणे: खूनाच्या गुन्हयामध्ये अलिबाग (जि. रायगड) न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगतांना पुण्यातील कारागृहात संचित रजेवर पसार झालेल्या किशोर गायकवाड (रा. वाकळनगाव, जि. ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने मोठया कौशल्याने १४ वर्षांनंतर अटक केली आहे. पनवेल येथील मंडळ अधिकाºयाच्या वतीने दहा हजारांची लाच स्वीकारतांना तो पकडला गेला. याच प्रकरणात तो जामीनावर सुटल्यानंतर ठाणे पोलिसांना त्याला पकडले.किशोर याने १९९७ मध्ये केलेल्या एका खूनाच्या गुन्हयामध्ये त्याला २००३ मध्ये अलिबाग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो २००६ मध्ये सचिंत रजेवर सुटल्यानंतर येरवडा कारागृह पुणे येथे हजर होणे अपेक्षित होते. तो हजर न होता, पसार झाला झाला होता. याप्रकरणी ७ जानेवारी २०१३ रोजी नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संचित तसेच पॅरोल रजेवर पसार झालेल्या आरोपींना शोधण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलिकडेच दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. किशोर हा आपले नाव बदलून वावरत असून तो १४ जानेवारी रोजी विटावा येथे येणार असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, उपनिरीक्षक सरक, हवालदार भिलारे, संभाजी मोरे, सुनिल जाधव, शिवाजी गायकवाड, नाईक दादा पाटील, अजय साबळे, राहूल पवार आणि नीलम वाकचौरे आदींच्या पथकाने ठाण्याच्या विटावा जकात नाका येथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर किशोर रामचंद्र म्हात्रे (४५, उसर्ली, ता. पनवेल, जि. रायगड) असे त्याने स्वत:चे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सखोल चौकशीमध्ये त्याने स्वत:चे नाव किशोर रघुनाथ गायकवाड असे सांगितले. त्याने त्याच्या साथीदारासह १ डिसेंबर १९९७ रोजी मुकूंद म्हात्रे (रा. रोहीजण, ता. पनवेल, जि. रायगड) याचा खून केल्याने त्याच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात तो येरवडा येथील कारागृहात शिक्षा भोगत असतांना संचित रजेवर बाहेर पडला होता. उर्वरित रजा भोगण्यासाठी हजर होण्याऐवजी त्याने स्वत:चे नाव बदलून उसर्लीगाव येथे तो वास्तव्य करीत होता, अशीही माहिती त्याने पोलिसांच्या चौकशीमध्ये दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक