शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रात एक कोटीचा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या अट्टल आरोपीस ठाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 20:30 IST

दरोडे, खून आणि फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या एका आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून गावठी कट्टा हस्तगत केला आहे.

ठळक मुद्देदरोडे, खून, फसवणुकीचे गुन्हेआंध्र पोलिसांनी जाहीर केले होते बक्षीसवागळे इस्टेट गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे : आंधप्रदेशमध्ये एक कोटी रुपयांचा सशस्त्र दरोडा टाकून फरार झालेल्या एका अट्टल आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्याच्या अटकेवर बक्षिसही जाहीर केले होते.अनेक गुन्हे दाखल असलेला एक अट्टल आरोपी अग्निशस्त्र विकण्यासाठी ठाण्यातील श्रीनगर भागात येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना सोमवारी मिळाली. त्यानुसार त्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या पथकाने श्रीनगरमधील आयटीआय सर्कलजवळ सापळा रचला. आरोपीच्या संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांना त्याला शिताफीने अटक केली. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले. क्षेत्रपाल उर्फ अविनाश कैलास प्रसाद (३५) हे आरोपीचे नाव असून, वागळे इस्टेटमधील इंदिरानगरात राहतो. तो मुळचा उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बिल्लथरारोड तालुक्याचा रहिवासी असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.आरोपीने जुलै २0१७ मध्ये आंध्रप्रदेशातील एका सराफा व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांचा सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडा टाकल्यापासून तो उत्तरप्रदेशात वास्तव्य करून होता. आंध्रप्रदेश पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला. मात्र त्याचा थांगपत्ता न मिळाल्याने आंध्रप्रदेश पोेलिसांनी त्याच्या अटकेवर २0 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. आरोपीविरूद्ध मुंबई आणि ठाण्यातही काही गुन्हे दाखल आहेत. कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा, काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा तर डायघर पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस