शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती येथे दरोडा टाकून लाखोंची लूट करणाऱ्या शिकलगार टोळीतील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:28 IST

अमरावती जिल्हयामध्ये २० लाखांचा आणि ३३ लाखांचा दरोडा टाकून पसार झालेल्या शिकलगार टोळीपैकी शिवासिंग शिकलगार (३०) आणि मुक्तासिंग जोगनसिंग टाक (३५) या दोघांनाही ठाणे परिसरातून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त कारवाईमध्ये नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्दे ५९ हजारांच्या रोकडसह सात लाखांचा मुद्देमाल जप्तठाणे गुन्हे शाखेची कारवाईठाणे परिसरातही केले जबरी चोरीचे गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अमरावती येथे दरोडा टाकून लाखोंची लूट करणा-या शिवासिंग शिकलगार (३०) याला कल्याणच्या अंबिवली येथून तर मुक्तासिंग जोगनसिंग टाक (३५) याला अंबरनाथ येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अमरावती पोलिसांबरोबर केलेल्या संयुक्त कारवाईत नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून ५९ हजारांच्या रोकडसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अमरावती जिल्हयामध्ये दोन महिन्यांपूर्वी परतवाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अज्ञात दरोडेखोरांनी २० लाखांचा ऐवज लुटला होता. तसेच ८ आॅगस्ट २०१९ रोजी चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३३ लाखांचा दरोडा टाकल्याने अमरावतील जिल्हयामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरोडेखोरांची ही टोळी ठाणे परिसरातील अंबिवली येथे लपल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. या टोळीला पकडण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीची मागणी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अमरावती पोलिसांनी केली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे, संदीप बागुल, पोलीस हवालदार शिवाजी गायकवाड आणि नरसिंग महापुरे आदींचे पथक पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी तयार केले. याच पथकाच्या मदतीने अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल किनगे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आंबिवली येथून शिवसिंग याला तर अंबरनाथ येथून मुक्तासिंग याला १७ आॅगस्ट रोजी ताब्यात घेतले. अमरावती पोलिसांनी या दरोडेखोरांकडून दरोडयातील १७२ ग्रॅम सोने, ८०० ग्रॅम चांदी तसेच ५९ हजारांची रोकड असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने ठाण्यातील दिवा तसेच ठाणे शहर परिसरातही जबरी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे अमरावती नंतर ठाणे पोलीसही त्यांचा ताबा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक