शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक 

By धीरज परब | Updated: March 17, 2023 14:00 IST

२०१६ साली झालेल्या हत्येतील एका आरोपीला ७ वर्षानंतर उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली.

मीरारोड - मीरारोड मध्ये २०१६ साली झालेल्या हत्येतील एका आरोपीला ७ वर्षानंतर उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात गुन्हे शाखा १ च्या पथकास यश आले आहे. 

मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात ९ जुलै २०१६  रोजी रईस रोशन अन्वर हुसेन याची हत्या करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शानु कालिया उर्फ शाहनवाज आयज अहमद, सोहेल शेख, नौशाद ऊर्फ अली इर्शाद शेख खान ह्या तिघांना अटक केली होती . तर चौथा आरोपी  असद अहमद सिध्दीकी हा फरार झाला होता . पुर्वीच्या वादाचा राग मनात धरुन चौघांनी रईस याची हत्या केली होती . 

हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे पथक आरोपीचा शोध घेत होते . गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक अविराज कुराडे तपास करत होते . सिध्दीकी हा हत्या केल्या पासून उत्तर प्रदेशच्या कौसुंबी जिल्ह्याच्या परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखाला मिळाली .  

कुराडे यांनी गुन्हे शाखेचे किशोर वाडीले,  पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, प्रशांत विसपुते यांचे पथक उत्तर प्रदेश येथे पाठवून सिध्दीकी ( वय ४१ वर्षे ) ह्याला १३ मार्च रोजी ताब्यात घेतले. आरोपीला नयानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. आरोपीला ठाणे न्यायालयाने २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी