शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मतदार यादीनुसार पालिका हाेणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 01:37 IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भात आदेश दिले होते. आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२० पर्यंत जी मतदार यादी तयार करण्यात आली होती, तीच यादी पालिकेच्या निवडणुकीत घेण्याचे आदेश दिले होते.

अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली असून या निवडणुकीसाठी जी मतदार यादी घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते ते रद्द केले आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये सुधारित मतदार यादी वापरली जाणार आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भात आदेश दिले होते. आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२० पर्यंत जी मतदार यादी तयार करण्यात आली होती, तीच यादी पालिकेच्या निवडणुकीत घेण्याचे आदेश दिले होते. या मतदार यादीनुसार कामही पालिकेने सुरू केले होते. मात्र कोरोनामुळे पालिकेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासकीय राजवट लागू करून सर्वप्रथम धोरणाच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या कामकाजाला स्थगिती देण्यात आली. या स्थगितीला नऊ महिने उलटत असून निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने आता राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भात काढलेला आपलाच आदेश रद्द केला आहे. १ जानेवारी २०२० पर्यंतची यादी निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होती. नेमकी कोणती मतदार यादी घ्यावी?निवडणूक आयोगाने दोन्ही पालिकांना १ जानेवारी २०२० ची मतदार यादी न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आगामी निवडणुकीसाठी कोणती मतदार यादी घ्यावी याबाबत कोणतेही निर्देश केलेले नाहीत. 

टॅग्स :Electionनिवडणूकambernathअंबरनाथbadlapurबदलापूर