शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मनोधैर्य वाढवण्यासाठी शास्त्रीय संगीताची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 02:26 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचाराबरोबर कोरोना रु ग्णांचे मनोधैर्य वाढण्यासाठी शास्त्रीय संगीताचा उपयोग केला जात आहे.

पंकज रोडेकर ठाणे : रुग्णांचे मानसिक संतुलन राखण्याबरोबर त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी संगीताचाही उपयोग होतो, असे सांगितले जाते. यामुळे कोविड-१९ चे विशेष रुग्णालय असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचाराबरोबर कोरोना रु ग्णांचे मनोधैर्य वाढण्यासाठी शास्त्रीय संगीताचा उपयोग केला जात आहे. यासाठी वॉर्डमध्ये सेंट्रल साउंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे. दिवसभर त्या वॉर्डात शास्त्रीय संगीतातील विविध राग रुग्णांना ऐकवले जात असून प्रत्येक वॉर्डात टीव्हीचीही व्यवस्था केली आहे. येथे बातम्या वगळता मनोरंजन होईल, असे विनोदी हिंदी- मराठी कार्यक्र म दाखिवण्यात येतात. त्याचबरोबर सर्वधर्म समभाव राखण्यावर विशेष भर दिला जात आहे. हम होंगे कामयाबसह प्रवचनकार वामनराव पै यांची हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे...चांगले आरोग्य दे... ही विश्वप्रार्थना ऐकवली जात आहे. या वॉर्डच्या आत-बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही वॉच ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाबाधितांना ज्या कक्षात ठेवले जाते, तेथे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही. त्यामुळे रु ग्णांना नातेवाईक, घरातील मंडळींना भेटता येत नाही. रुग्णास कोणाला भेटण्यासाठी परवानगी नसल्याने त्यांच्यात एकाकीची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन व मनोधैर्य राखण्यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात डॉक्टरांमार्फत हम होंगे कामयाब... यासारखे समूहगीत गाऊन टाळ्याही वाजवण्यात येतात; परंतु डॉक्टरांनी परिधान केलेल्या किटमुळे त्यांना मोठ्या आवाजात बोलणे शक्य होत नाही. त्यातूनच मानसिक संतुलन राखण्यात व त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी संगीताचा उपयोग होतो.>विविध वाद्यरागांवर विशेष भररु ग्णांचे मानसिक संतुलन व मनोधैर्य राखण्यात शास्त्रीय संगीताचा उपयोग होतो, असे म्हटले जात आहे. यातूनच एकदम सौम्य आवाजात शास्त्रीय संगीतातील विविध वाद्यांचे राग रुग्णांना ऐकवण्यात येत आहे. हे दिवसभर संगीत लावण्यात येणार असून रात्रीच्या वेळेस ते बंद ठेवले जाते. त्याचबरोबर, रु ग्णालयातील वॉर्डांत एकाच वेळी सूचना देण्यासही सिस्टीम उपयोगी पडत आहे.सुरुवातीला रु ग्णांचे मनोधैर्य आणि संतुलन राखण्यासाठी हम होंगे कामयाब हे समूहगीत तोंडाने बोलले जात होते. मात्र, सेन्ट्रल साउंड सिस्टीममुळे शास्त्रीय संगीतावर विशेष भर दिले जात असून विविध वाद्यांचे राग त्याद्वारे आता वाजवले जातात. तसेच टीव्हीवर हिंदी-मराठीतील विनोदी कार्यक्र म प्रसारित केले जात असून तशी व्यवस्थाच केबलधारकाकडून करून घेतली आहे.- डॉ. प्रसाद भंडारी, ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालय.>जिल्हा सामान्य रु ग्णालयात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सुरु वातीला डॉक्टरांमार्फत हम होंगे कामयाब... यासारखे समूहगीत बोलून रु ग्णांचे मनोधैर्य राखले जात आहे. तर रु ग्णालयात सेंट्रल साउंड सिस्टीमची व्यवस्था असल्याने रु ग्णांचे मानसिक संतुलन राखण्याबरोबर व त्यांचे मनोधैर्य वाढण्यात संगीताचा उपयोग करणे सुरू केले आहे. त्याचा रु ग्णांना निश्चित फायदा होईल.तसेच त्यांचे मनही संगीतामुळे प्रसन्न होईल.- डॉ . कैलाश पवार, जिल्हा. शल्यचिकित्सक, ठाणे.