शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

चुकीच्या दुभाजकामुळे होताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:05 IST

वाहनांचे नुकसान : संबंधित यंत्रणेने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी

डोंबिवली : पूर्वेतील पेंढरकर महाविद्यालय रोडवर रोटरी उद्यानासमोर असलेल्या दुभाजकावर वाहन आदळून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. दर एक-दोन दिवसांच्या फरकाने याठिकाणी अपघात होत आहेत. दुभाजकाची रचना योग्यप्रकारे नसल्याने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

डोंबिवली शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांमध्ये या रस्त्याची गणना होत असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या रस्त्यावर लहान मुलांचे खेळण्याचे उद्यान असल्याने दुभाजक बांधण्यात आला असला तरी त्याच्यावर वाहने आदळून अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ज्या रस्त्यावर हा दुभाजक आहे, तो केडीएमसीच्या हद्दीत असला तरी त्याची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) आहे. संबंधित दुभाजक बांधताना तो योग्य प्रकारे बांधला गेलेला नाही. त्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत असून तो केवळ रोटरी उद्यानासमोरील भागापर्यंतच सीमित ठेवण्यात आला आहे. दुभाजक पेंढरकर महाविद्यालयापर्यंत असायला हवा होता, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर पथदिव्यांची सुविधा आहे, पण रात्री येथे सदैव अंधाराचे साम्राज्य असते. यात दुभाजक दिसत नाही. त्यामुळे वाहने दुभाजकावर आदळण्याचे प्रकार घडत आहेत. काही वाहने तर दुभाजकावर चढल्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, सातत्याने घडणारे अपघात पाहता काही महिन्यांपूर्वी ज्याठिकाणी वाहने आदळतात तेथे धोकादायक सूची लावली गेली होती. पण ती गायब झाल्याने पुन्हा अपघात वाढले आहेत. या परिसरात छोटी हॉटेल्स आहेत, तसेच सायंकाळी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात लागतात. या परिसरात संध्याकाळी वाहनांची वर्दळ असते. येथे महाविद्यालय असून एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे मुख्य कार्यालयही आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. बांधकाम विभागाच्या कल्याण येथील कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही....अन्यथा मोठी दुर्घटना घडेलवारंवार या दुभाजकावर वाहने आदळून अपघात होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गस्थ होताना काहीशी सावधगिरी बाळगावी लागते. डोंबिवलीच्या दिशेला जाणाºया वाहनचालकाला दुभाजक दिसून येत नाही ही वस्तुस्थिती आहे. जास्तीत जास्त अपघात हे रात्रीच्या वेळेत घडले आहेत. तत्काळ संबंधित यंत्रणेने लक्ष घालावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वनजा कार्ले या दुचाकीचालक तरुणीने सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाdombivaliडोंबिवली