शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये शिवाजी चौकात "त्याच" जागी पुन्हा अपघात; बसखाली येऊन महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 21:54 IST

उंचसखल रस्त्याने घेतला ४० वर्षीय महिलेचा बळी; घटना सीसीटीव्हीत कैद 

कल्याण - जवळपास महिनाभरपूर्वी शिवाजी चौक परिसरात उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला महिना उलटत नाही तोवर पुन्हा एकदा याच रस्त्यावर त्याच ठिकाणी दुचाकीचा तोल गेल्याने दुचाकीव मागे बसलेली महिला रस्त्यावर पडून बस खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. मनीषा भोईर (वय - ४०) असे या मयत महिलेचे  नाव असून ती चिकन घर परिसर राहणारी होती. ती कल्याणमधील एका खाजगी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होती. तिच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा व पती असा परिवार आहे. शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणादरम्यान रस्त्यांच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये लेव्हलिंग न करण्यात आल्याने रस्ते वरखाली झाले आहेत. नागरिकांच्या जीवावर उठलेल्या अशा रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .

शिवाजी चौकात महिनाभरापूर्वी दुचाकी घसरून पडली. यामुळे झालेल्या अपघातात आई - वडिलाबरोबर दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आज दुपारी चार वाजताच्या सुमारास  मनीषा भोईर ही महिला एका इसमसाह दुचाकीने शाळेतून घराच्या दिशेने  शिवाजी चौकातून जात असताना केम्ब्रिज दुकानासमोरील उंचसखल रस्त्यामुळे  दुचाकी घसरली आणि पाठीमागे बसलेल्या मनीषा भोईर रस्त्यावर पडल्या आणि बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आल्या. या दुर्दैवी अपघातात जखमीं झालेल्या भोईर यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,तिचा मृत्यू झाला.  ही घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी शिवाजी शहा यांनी मी  दुकानाच्या बाहेर उभा असताना हि घटना बघितली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातkalyanकल्याण