शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 23:37 IST

प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होते.

अंबरनाथ : प्राचीन शिव मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होते. शेकडो भाविक हे महादेवाच्या दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहतात. त्यातच, दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी भाविकांना वेळ लागत असल्याने यंदाच्या महाशिवरात्रीत दर्शनरांगेतील भाविकांना गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारातूनच दर्शन घेण्याबाबत पोलीस प्रशासन विचार करत आहेत. गर्दीवर नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी हा प्रयोग केला जाणार आहे. यासंदर्भात मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात अंतिम चर्चा सुरू आहे.शिव मंदिरात महाशिवरात्रीला होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने आता काही प्रमाणात कठोर निर्णय घेण्याचे काम सुरू केले आहे. शिव मंदिराचा मार्ग एकदिशा करण्यात आला आहे. तर, मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता ही गर्दी लवकर पुढे सरकावी, यासाठी भाविकांना मंदिराच्या गाभाºयात न पाठवता प्रवेशद्वाराजवळूनच दर्शन घेण्याची सोय करण्यासाठी पोलीस आणि मंदिर प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे. सुरुवातीला मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यास विरोध केला होता. मात्र, भाविकांनाही गाभाºयात उतरताना आणि चढताना त्रास होत असल्याने पोलिसांनी वस्तुस्थितीची जाणीव करून दिल्यावर आता यासंदर्भात चर्चा सुरू करण्यात आली आहे.गाभाºयात जाण्यासाठी असलेला मार्ग हा अत्यंत अरुंद असल्याने भाविकांना सहा ते दहा तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन किमान शिवरात्रीसाठी भाविकांना गाभाºयातून दर्शन न देता प्रवेशद्वारातूनच दर्शन द्यावे, अशी विनंती केली आहे. त्यावर एकवाक्यता अजूनही झालेली नसली, तरी योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.दुसरीकडे देशातील तणावपूर्ण वातावरणामुळे मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव दलाचे पथक, एक सहायक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, २५ सहायक पोलीस निरीक्षक, २५० कर्मचारी, ७० महिला पोलीस, १५० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहे.तसेच भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य पथक, वीज यंत्रणा, फायर यंत्रणा, दुर्बीणधारी टॉवर, सीसीटीव्ही, छेडछाडविरोधी पथक, साध्या वेशातील पोलीस, श्वान पथक, पोलीसमित्र आणि स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते भाविकांच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहणार आहेत. दर्शनासाठी जिल्हा आणि बाहेरूनही भाविक मोठ्या संख्येने येतात.>मंदिर झळकलेमंदिर परिसरात मनोरंजनाचे कार्यक्रम आणि पाळणे यांच्यासाठी काही अंतरावर सोय करण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अग्निशमनविरोधी यंत्रणा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यात्रेच्या मार्गावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त राहणार आहे. मंदिराच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.