शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
5
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
6
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
7
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
8
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
9
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
10
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
11
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
12
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
13
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
14
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
15
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
16
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
17
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
18
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
19
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
20
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

स्वीकृतसाठी शिवसेनेचा निष्ठावंतांना न्याय

By admin | Updated: April 16, 2017 04:28 IST

ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर शिवसेनेने निष्ठावंतांना पदे देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्याचेच निश्चित केले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता संपादित केल्यानंतर शिवसेनेने निष्ठावंतांना पदे देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्याचेच निश्चित केले आहे. महापौरपद निष्ठावान शिवसैनिकाला दिल्यानंतर आता पुन्हा स्वीकृतपदासाठीदेखील तिघा निष्ठावंतांना संधी दिली आहे. भाजपाकडून अपेक्षेप्रमाणे शहराध्यक्ष संदीप लेले आणि राष्ट्रवादीकडून मनोहर साळवी यांनी शनिवारी महापालिकेकडे गटनेत्यांचे पत्र सादर केले. या पाच जणांची निवड येत्या २० एप्रिलच्या महासभेत होणार आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७, राष्ट्रवादीचे ३४, भाजपाचे २३, काँग्रेस ३, एमआयएम २, अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. त्यानुसार, आता मागच्या दाराने प्रवेश करण्यासाठी शिवसेनेकडून तिघे, तर राष्ट्रवादी व भाजपाकडून एक जण पालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहे. त्यानुसार, शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे पुन्हा निष्ठावंतांना न्याय दिला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेले कळव्यातील राजेंद्र साप्ते, वागळे पट्ट्यातील दशरथ पालांडे आणि शहरप्रमुख रमेश वैती यांचे पुत्र जयेश वैती यांना संधी दिली आहे. सुरुवातीपासून वैती आणि राजेंद्र यांची नावे अंतिम मानली जात होती. परंतु, तिसऱ्या नावावरून बऱ्याच जणांनी श्रेष्ठींकडे तगादा लावला होता. अखेर, श्रेष्ठींनी तिसऱ्या जागीदेखील निष्ठावान शिवसैनिकालाच संधी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतून सुरुवातीला अमित सरय्या यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, त्यांचे नाव पिछाडीवर पडल्यानंतर कळव्यातून मनोहर साळवी यांनी शनिवारी स्वीकृतसाठी अर्ज सादर केला. दुसरीकडे भाजपामधूनदेखील एकमेव शहराध्यक्ष संदीप लेले यांच्याच नावाची चर्चा मागील काही दिवस सुरू होती. त्यांच्या नावाला त्यांच्याच पक्षातील दुसऱ्या गटाने विरोध केला असून त्यांच्याविरोधात सह्यांची मोहीम घेऊन त्यांना हे पद मिळू नये, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. (प्रतिनिधी) अंतर्गत वाद चव्हाट्यावरपक्षाने दुसऱ्या गटाची ही मोहीम मोडीत काढून अपेक्षेप्रमाणे लेले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार, या सर्वांची निवड २० एप्रिलच्या महासभेत होणार आहे. लेले यांच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून येणार असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.