शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकावर ACBची कारवाई; बलात्काराबद्दलची कारवाई न करण्यासाठी मागितली लाच

By जितेंद्र कालेकर | Updated: December 5, 2022 19:23 IST

बलात्काराबद्दलची कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर ACBने कारवाई केली. 

ठाणे : बलात्कारासह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलमांची कारवाई न करण्यासाठी संबंधितांकडून ३५ हजारांची लाच घेणाऱ्या मुंब्रा पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश लाहीगुडे (५२) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी त्याच पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ अ, ३२३ आणि ५०४ अर्थात कौटुंबिक हिंसाचारासह हुंडाबंदी अधिनियम कलम चार हा गुन्हा दाखल आहे. 

याच गुन्हयात कलम ३७६ आणि आयटी अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई न करण्यासाठी आरोपी लाहीगुडे याने १ डिसेंबर २०२२ रोजी ८० हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीअंती ३५  हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदारांनी याप्रकरणी ठाणे एसीबीमध्ये तक्रार दिली. त्यानुसार याबाबत एसीबीच्या पथकाने पडताळणीही केली. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी सापळा रचून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ३५ हजारांची लाचेची रक्कम स्वीकारतांना लाहीगुडे याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील या अधिक तपास करीत आहेत.

  

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी