शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कारणे दाखवा नोटीस बजावूनही दोघे सहाय्यक आयुक्त बदलीच्या गैरहजर

By अजित मांडके | Updated: August 18, 2022 15:19 IST

शासनाकडे परत पाठविण्यासाठी पालिकेची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समिती व वर्तकनगरचे सहाय्यक आयुक्त सचीन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. मात्र बदली होऊनही हे अधिकारी आपल्या कर्तव्यावर हजर झालेले नसल्याने प्रशासनाकडून त्यांना कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतरही ते २४ तासाच्या आत कर्तव्यावर हजर न झाल्याने अखेर पालिका प्रशासनाने त्या दोघांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या दोघांनी जुन्याच ठिकाणी आपले कर्तव्य कायम ठेवण्यासाठी राजकीय मंडळीकरवी दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केल्याचही माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे पुन्हा पेव फुटले असून या बेकायदा बांधकामांवरून पालिकेवर टीका होत आहे. असे असतानाच पालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली असून याशिवाय त्यांच्याकडे परवाना विभाग, क्लस्टर सेलचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तर, कळवा प्रभाग समतिीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे निवडणुक विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 

ठाणे महापालिकेत बदली झालेले सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणोकर यांना कळवा प्रभाग समिती देण्यात आली आहे. त्यानुसार ते आता प्रभाग समितीत हजर झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे या सहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त पदभारासह सोपविण्यात आलेल्या विभागांचा कार्यभार तात्काळ स्विकारु न अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले होते. मात्र ते हजर न झाल्याने पुढील २४ तासात हजर राहण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

मात्र तरी देखील हे दोघेही बदलीच्या ठिकाणी हजर झाले नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता पालिकेकडून पुढील पावले उचलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यासाठी पालिका आता राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडून झालेल्या कामाची माहिती देखील त्यात दिली जाणार असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारसही केली जाणार असल्याची माहिती सुत्रंनी दिली. दुसरीकडे या दोनही सहाय्यक आयुक्तांनी आता आपल्याकडे पूर्वीचीच प्रभाग समिती राहावी या उद्देशाने राजकीय मंडळींकडे जोडे ङिाजविण्यास सुरवात केली असून त्यांच्याकडून आपल्याला हवी असलेली प्रभाग समिती मिळू शकते असा विश्वास त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते बदलीच्या ठिकाणी हजर राहत नसल्याचे दिसून आले आहे.

संबधींत दोनही सहाय्यक आयुक्त आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात आयुक्तांबरोबर चर्चा करुन शासनाकडे परत पाठविण्यासाठी  पत्र व्यवहार केला जाणार आहे. - संजय हेरवाडे - अतिरिक्त आयुक्त, ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका