शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

ठाण्यातील अभिनय कट्ट्याने दिली अभिषेकला जगण्याची संजीवनी, कट्ट्यावर सादर केली एकांकिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:58 IST

अंथरुणाला खिळलेला अभिषेक जाधव पुन्हा एकदा अभिनय कट्ट्याच्या रंगमंचावर उभा राहीला आणि सांगून गेला गोष्ट तुझी नी माझी.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर गोष्ट तुझी माझी सादर अभिनय कट्ट्याने अभिषेकला दिला आत्मविश्वास एकांकिकेत अभिषेकने साकारली मुख्य भूमिका

ठाणे : आपल्या कलेच्या जीवनात अभिषेक जाधवचा प्रवास सुकर सुरु असताना त्याला एका दीर्घ आजाराने ग्रासले. परंतू अभिनय कट्ट्याचे संस्थापक - अध्यक्ष किरण नाकती यांच्यावर असलेला दृढ विश्वास आणि कट्ट्याची ओढ यांमुळे त्याने आपल्या आजारावर मात करीत रविवारच्या कट्ट्यावर तो उभा राहीला. गोष्ट तुझी माझी या एकांकिकेतून त्याने स्वत: भूमिका साकारली.     अभिनय कट्ट्यावर विविध सादरीकरणांच्या माध्यमातून आपली उल्लेखनीय भूमिका निभाविणारा अभिषेकला एका दीर्घ आजाराने ग्रासले, तो पलंगाला खिळून राहीला आणि वर्षभर कट्ट्याच्या रंगमंचापासून अलिप्त राहीला. या गोष्टीची मात्र त्याला सतत खंत होती. माझे काहीही होण्याआधी एकदा तरी मला कट्ट्यावर सादरीकरण करण्याची त्याने इच्छा व्यक्त केली. परिस्थीती चिंताजनक होती. परंतू किरण नाकती यांनी त्याला कट्ट्यावरील सादरीकरणापासून तुला कोणताही आजार रोखू शकणार नाही हा शब्द दिल्यावर हळूहळू त्याच्यापुढे आजारपणही फिके पडू लागले आणि चालताही न येणारा अभिषेक रंगमंचावर वावरू लागला. त्याचा आत्मविश्वास वाढविणारा प्रवास आता सुरु झाला आणि अभिनय कट्टा अभिषेकला जगण्याची संजीवनी देऊ लागला. त्याने चक्क एक एकांकिका स्वत: लिहीली आणि ही एकांकिका ३५२ क्रमांकाच्या कट्ट्यावर सादर झाली. ‘गोष्ट तुझी माझी’ या एकांकिकेचे फक्त लेखनच नव्हे तर प्रमुख भूमिका सुद्धा त्याने साकारली. या एकांकिकेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून अभिषेकने पुन्हा एकदा त्याची इच्छा शक्ती किती प्रबळ आहे हे सिद्ध करून दाखवले. दिग्दर्शनाची धुरा गणेश गायकवाड याने सांभाळली तर इतर सहाय्यक भूमिकांमधून आरती ताथवडकर, वीणा छत्रे, गणेश गायकवाड, प्रशांत सकपाळ व अभिषेक सावळकर यांनी आपली चुणूक दाखवली.यावेळी अभिषेकचे संपूर्ण कुटुंब परिवार, त्याची मित्र मंडळी इतकेच नव्हे तर त्याचे डॉक्टर सुद्धा उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकentertainmentकरमणूक