अबब! ठाण्यात ३१८ पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:44 AM2021-01-16T04:44:04+5:302021-01-16T04:44:04+5:30

ठाणे : ठाण्यात कोरोनापाठोपाठ बर्ड फ्लूने वेगाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी शहरात एकाच दिवशी ...

Abb! 318 birds die in Thane | अबब! ठाण्यात ३१८ पक्ष्यांचा मृत्यू

अबब! ठाण्यात ३१८ पक्ष्यांचा मृत्यू

Next

ठाणे : ठाण्यात कोरोनापाठोपाठ बर्ड फ्लूने वेगाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी शहरात एकाच दिवशी तब्बल १६१ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १३४ कोंबड्यांचा समावेश आहे. तर गुरुवारपर्यंत शहरात ३१८ विविध जातीच्या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. मुंब्य्रात गुरुवारी अज्ञात वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत असलेल्या कोंबड्या सोडून पळ काढल्याने महापालिकेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

देशभरातील अनेक राज्यांत कोरोनापाठोपाठ बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. राज्यातदेखील आठ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने दस्तक दिली आहे. ठाण्यातदेखील या आजाराने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले वर्षभर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता कुठे मूळपदावर येत असतानाच या नव्या संकटाने सर्व जण धास्तावले आहेत. राज्यातील अनेक कुक्कुटपालक चिंतित असून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका सतर्क झाली आहे. महापालिकेने एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला असून कोणताही पक्षी मृत आढळल्यास नागरिकांनी तत्काळ दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कले आहे.

* ‘त्या’ वाहनचालकाचा शोध सुरू

शहरात रोजच्या रोज पक्षी मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे पालिकेने मागील काही दिवसांत शहरातील सर्वच चिकन दुकानांची पाहणी केली होती. परंतु, त्यात काही विशेष आढळलेले नाही. विशेष म्हणजे बुधवारपर्यंत शहरात एकाही कोंबडीचा मृत्यू झाला नव्हता. परंतु, आता मुंब्य्रात एकाच दिवशी १३४ कोंबड्या मृतावस्थेत सोडून पळ काढणाऱ्या वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी महापालिकेने आता मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या कोंबड्या ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांची विल्हेवाट लावली आहे. परंतु दुसरीकडे बर्ड फ्लूने शहरात ४ पोपटांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे.

पक्षी मृत्यूचा तक्ता

पक्ष्यांचा प्रकार संख्या

कोंबडी १३४

बगळे २५

कावळे १२१

कबुतर २३

पोपट ४

पाणकोंबडी १

कोकीळ १

बदक १

गरुड १

Web Title: Abb! 318 birds die in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.