शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे; आदिवासी तरुण बनला पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 07:07 IST

नोकरी करत जिद्दीने पूर्ण केले शिक्षण

मुरबाड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत (पीएसआय) मुरबाड तालुक्यातील चाफेवाडी या आदिवासीवस्तीतील जयवंत रामा वारा यांनी एसटी प्रवर्गात घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तालुक्यातील आदिवासीबांधवांसह सर्वांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या जयवंत वारा यांच्याकडे अठराविश्वे दारिद्र्य. वडील गावात शेती करण्यासोबतच मोलमजुरी करुन मिळालेल्या पैशांतून कुटुंब चालवत असत. मुलांना शिकवण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने जयवंत यांना त्यांच्या वडिलांनी पहिलीपासून सासणे (कान्होळ) येथील शासकीय आश्रमशाळेत दाखल केले. तेथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा, खुटल (बारागाव) येथे, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आदिवासी वसतिगृहात राहून पूर्ण केले.आईवडील निरक्षर, तसेच घरची हलाखीची परिस्थिती यामुळे जयवंत यांनी गावाजवळच असलेल्या फार्महाउसवर मजुरी करण्यास सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी कुटुंबास हातभार लावण्यास सुरुवात केली. तसेच स्वत:चे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले.पदवी घेतल्यानंतर काही दिवसांत त्यांनी मुंबई महानगरपालिकेत सुरक्षारक्षकाची नोकरी मिळवली. ही नोकरी करताकरताच त्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती झाली आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या काही गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही.नोकरी सांभाळत पुन्हा त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.जुलै २०१८ मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला.या परीक्षेत अनुसूचित जमातीच्या पुरु ष गटात चोेविसावा क्रमांक मिळवत त्यांनी घवघवीत यश संपादन केले.आदिवासी तरु णांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.तसेच मेहनत करून समाजात नवा आदर्श निर्माण करावा.आपल्या मदतीला कोणी येईल, यासाठी न थांबता स्वत:च स्वत:चे भविष्य घडवून इतरांसमोर आदर्श निर्माण करावा असे जयवंत वारा यांनी लोकमतला सांगितले.