शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

टोईंग केलेल्या गाडीमागे धावताना जाळीत पाय अडकून तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 07:56 IST

टोईंग गाडीवाल्यांनी विनय भोईर यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली मोटरसायकल उचलली. 

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरातील नो पार्किंग ठिकाणी उभी केलेली मोटरसायकल टोईंगवाले नेताना तरुणाने तिकडे धाव घेतली. मात्र, दुकानासमोरील लोखंडी जाळीत पाय अडकून तो तरुण जाणाऱ्या रिक्षावर पडल्याने, गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. टोईंगवाल्यासह दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

उल्हासनगरात रस्त्याच्या नो पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या गाड्या कोणतीही पूर्वसूचना देता व मार्किंगविना उचलल्या जात असल्याने, टोईंगवाल्यांविरोधात नागरिकांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. या दरम्यान शहरात पश्चिममध्ये शनिवारी दुपारी टोईंग गाडीवाल्यांनी विनय भोईर यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली मोटरसायकल उचलली. 

डोक्याला तब्बल १७ टाके उचललेली गाडी घेण्यासाठी विनय धावत गेला असता, दुकानासमोर ठेवलेल्या लोखंडी जाळीत पायात अडकून रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर जाऊन पडला. यामध्ये त्याचे डोके फुटून रक्ताने माखला. टोईंग गाडीवरील वाहतूक पोलिस व स्थानिक व्यापाऱ्यांनी विनयला क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्याच्या डोक्याला तब्बल १७ टाके पडले असून, आमदार कुमार आयलानी यांच्यासह व्यापाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

कारवाई करण्याची मागणीn अपघातानंतर व्यापारी व स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभाग कार्यालयात धाव घेऊन टोईंगवाल्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दुकानासमोर थेट फुटपाथच्या पुढील रस्त्यावर लोखंडी जाळी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. n दुकानांसमोर अवैधपणे जाळी ठेवूनही महापालिका प्रभाग अधिकारी कारवाई करीत नसल्याने, अशा अधिकाऱ्यांवरही या निमित्ताने कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला आहे.

वाहतूक विभाग आरोपीच्या पिंजऱ्यातवाहतूक विभागाच्या टोईंगवाल्यांमुळे विनय भोईर जखमी झाला असल्याचा आरोप एकीकडे होत आहे, तर दुसरीकडे व्यापारी दुकानासमोरील फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर लोखंडी जाळी टाकत असल्याने असे अपघात होत असल्याचे बोलले जाते. दुकानासमोर लोखंडी जाळ्या ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून या जाळ्या महापालिका जप्त का करीत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातप्रकरणी दादागिरी करणारे टोईंगवाले व संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरtraffic policeवाहतूक पोलीस