शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडला भरचाैकात तरुणाची केली हत्या, नऊ जणांना अटक, दाेघांचा शाेध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:27 IST

Crime News: मीरा रोडच्या जांगिड सर्कल भागात वर्दळीच्या भररस्त्यावर अंकुश राजेश राज (२०, रा. क्वीन्स स्टार, मीरा राेड) या तरुणाची ११ जणांच्या टोळक्याने चाकू, तलवारीने हल्ला करून हत्या केली.

मीरा रोड : मीरा रोडच्या जांगिड सर्कल भागात वर्दळीच्या भररस्त्यावर अंकुश राजेश राज (२०, रा. क्वीन्स स्टार, मीरा राेड) या तरुणाची ११ जणांच्या टोळक्याने चाकू, तलवारीने हल्ला करून हत्या केली. याप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दाेन जणांचा शोध पोलिस घेत आहेत. 

मीरागाव महामार्गावरील पेट्रोलपंपावर सोमवारी गाडी पुढे नेल्याच्या कारणावरून मृत अंकुशचे मामा हर्ष राज व आयुष सिंग (२०, रा. काशिगाव) यांच्यात भांडण झाले. तेथे हर्ष राजने आयुषला कड्याने मारले. त्यावेळी अंकुशने दाेघांचे भांडण सोडवले. त्याचा राग आयुषच्या मनात हाेता. त्यानंतर एमटीएनल मार्ग व जांगिड सर्कलदरम्यान असलेल्या एका गॅरेजवर अंकुश हा सायंकाळी दुचाकीचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी आला हाेता. त्यावेळी आयुष्य हा त्याच्या अन्य १० साथीदारांसह चाकू, तलवार घेऊन तेथे आला. भररस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी आयुष्य व त्याच्या साथीदारांनी अंकुशवर हल्ला चढवला. त्याच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंकुशला नजीकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंकुश हा एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. हत्येची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त विलास सानप हे  मीरा रोड, काशिमीरा, नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे निरीक्षक आदी घटनास्थळी दाखल झाले.

सीसीटीव्हीच्या आधारे आराेपींची धरपकडहल्ल्याची संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. त्याआधारे गुन्हे शाखा कक्ष १ चे निरीक्षक अविराज कुराडे व पथकाने वेगाने तपास करून आयुष याच्यासह आकीब अन्सारी (२०), फरहान शेख (१९), अरमान लदाफ (१९, सर्व रा. काशिगाव), हैदर पठाण (१९, रा. डाचकूलपाडा) यांना पकडले. तर अशपाक मन्सुरी (२५, रा. स्नेहल नगरी) याला काशिमीरा पोलिसांनी पकडले. मेहताब खान (२२, रा. नयानगर), अमित सिंग (३०) व सरवर हुसेन खान (२३, दाेघेही शांतीनगर) यांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली. आणखी दाेघांचा शाेध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी