शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला मेसेज पाठविल्याच्या रागातून तरुणावर चाकूने हल्ला, नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By जितेंद्र कालेकर | Updated: May 13, 2024 23:18 IST

याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.

ठाणे : बहिणीला मेसेज पाठविल्याच्या संशयातून ऋषिकेश चाचरे (२५, रा. पाचपाखाडी, ठाणे) याच्यावर २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार केल्याची घटना घडली. यात मध्यस्थी करणाऱ्या ऋषिकेश याच्या मैत्रिणीच्या उजव्या हातावर वार करून तिलाही गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही जखमींवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी सोमवारी दिली.ठाण्यातील पाचपाखाडी भागातील आनंद सावली गृहसंकुलातील त्याच्या घरी ११ मे २०२४ रोजी ऋषिकेश सायंकाळी ४:३० वाजता त्याच्या मैत्रिणींसह होता. त्याचदरम्यान प्रणील पवार (२०, नावात बदल) आणि गणेश शेट्टी (२५, रा. सावरकरनगर, ठाणे) हे दोघेही त्याच्या घरी गेले. यातील प्रणीलने बहिणीला मेसेज पाठवतो, याचा राग मनात धरून शिवीगाळ करीत गणेशने त्याचे दोन्ही हात समोरून पकडले. त्यानंतर प्रणीलने त्याच्याकडील चाकूने त्याच्या बगलेखाली तसेच, पाठीवर खुपसून गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या प्रकाराने घाबरलेल्या प्रणीलच्या मैत्रिणीने यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.प्रणीलने त्याच्याकडील चाकूने तिच्याही उजव्या हातावर गंभीर दुखापत करून तिला जखमी केले. त्यानंतर तिने आरडाओरडा केल्यानंतर दोघेही हल्लेखोर तिथून फरार झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशला त्याच्या मैत्रिणीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावरही याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस