शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यापाऱ्याने गमावले ३० लाख

By धीरज परब | Updated: April 30, 2023 14:34 IST

भाईंदर पश्चिमेस राहणारे रवि कांतीलाल मेहता ( ४५ )  हे जमीन खरेदी विक्री व स्टीलचा व्यवसाय करतात. 

मीरारोड - एका दिवसात पैसे दुप्पट होण्याच्या लोभाने भाईंदर मधील एका व्यापाऱ्याने स्वतःचे तीस लाख रुपये गमावल्याचे घटना घडली आहे भाईंदर पोलिसांनी एकास अटक केली आहे.

भाईंदर पश्चिमेस राहणारे रवि कांतीलाल मेहता ( ४५ )  हे जमीन खरेदी विक्री व स्टीलचा व्यवसाय करतात.  जमीन खरेदी विक्री व्यवसायात जमीनीच्या कागदपत्रांचे काम भुषण मांडवकर करतो.   भूषण याने मेहतांना त्यांच्या मित्राने आणलेल्या योजनेची माहिती दिली.  ५ लाख रुपये भरल्यास ते एक "पे बाय नियर वॉलेट"  नावाचे स्पेन देशाचे वॉलेट उघडून त्यात गुंतवणूक केली जाते. त्यामध्ये नंतर रोखीने २५ लाख भरावे लागतात. ती रक्कम भरल्यास दुसऱ्या दिवशी ५४ लाख रुपये मिळतात अशी योजनेची माहिती भूषण याने मेहतांना दिली. भूषणच्या सांगण्या नुसार मेहतांनी  करण व राहुल यांना ५ लाख रुपये दिले.  दोघांनी मेहता यांचे वॉलेट अकाऊंट उघडल्या नंतर मेहता यांच्या त्या वॉलेट खात्यात साडे तीन लाख रुपये जमा झाले.

झटपट भरपूर पैसे मिळत असल्याचे पाहून मेहतांनी त्या दोघांना रोखीने २५ लाख रुपये दिले.  दोन दिवसात पैसे खात्यात येतील असे त्यांनी सांगितले. मात्र पैसे न आल्याने मेहतांनी करण व राहुल यांना विचारणा केली असता दोघांनी चालढकल सुरू केली. त्यांनी बनावट ईमेल आयडी बनवून त्याद्वारे मेहतांना खोटे स्टेटमेंट पाठवत व पैसे मिळतील असे सांगत होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मेहतांच्या फिर्यादी वरून  भाईंदर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिसांनी करण रजोरा याला अटक केली असून राहुल गायकवाड याचा शोध सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस