शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भिवंडीत सराईत चोरट्यांच्या चौकडीला अटक; क्लिनरला लोखंडी सळई ने मारहाण

By नितीन पंडित | Updated: March 30, 2024 18:28 IST

याबाबत ट्रक चालक क्लिनर यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरां विरोधात गुन्हा दाखल केला होता.

भिवंडी: भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर सकाळच्या सुमारास ट्रक चालकावर हल्ला चढवत त्याला लुटणाऱ्या चार जणांच्या चौकडीस कोनगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक करण्यात यश मिळवले असल्याची माहितीइ कोनगाव पोलोसांनी शनिवारी दिली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर २६ मार्च रोजी सकाळी सहा वाजता च्या सुमारास टायर चेक करण्यासाठी ट्रक चालक खाली उतरला असता चार चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत ट्रक चालकासह क्लिनरला लोखंडी सळई ने मारहाण करून त्याच्याकडील ४६६० रुपये रोख रक्कम व आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, अशा वस्तू जबरी चोरी करून पसार झाले होते.

याबाबत ट्रक चालक क्लिनर यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरां विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशीकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे व तपास पथकातील पोलिस कर्मचारी मधुकर घोडसरे,नरेन पाटील,रमाकांत साळुंखे,राहुल वाकसे,हेमंत खडसरे, हेमराज पाटील,अच्युत गायकवाड,कुशल जाधव यांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने प्रकरणातील आरोपी शिवा नायक,निखिल कोरसे,संतोष राठोड व रवी गौड या चार सराईत चोरट्यांना अवघ्या २४ तासात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्याची उकल करून जबरी चोरीतील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे.सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे हे करीत आहेत.