भिवंडीत निवासी इमारतीमधील गोदामास भीषण आग 

By नितीन पंडित | Published: April 25, 2024 05:13 PM2024-04-25T17:13:13+5:302024-04-25T17:13:34+5:30

इमारतीत व आजूबाजूला नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूर निघत राहिल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या.

A massive fire broke out in a warehouse in a residential building in Bhiwandi | भिवंडीत निवासी इमारतीमधील गोदामास भीषण आग 

भिवंडीत निवासी इमारतीमधील गोदामास भीषण आग 

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: शहरातील नवीवस्ती नेहरू नगर येथील निवासी इमारतीच्या तळमजल्या वरील जीन्स बनविणाऱ्या गोदाम कारखान्यास गुरुवारी दुपारी भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.

 इमारतीत व आजूबाजूला नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूर निघत राहिल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या.परंतु धुराचा त्रास मोठ्या प्रमाणावर निवासी इमारती मधील कुटुंबीयांना झाल्याने नागरिकांनी घरा बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.या आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल होत त्यांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले.ही आग नक्की कशा मुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नसून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही .

Web Title: A massive fire broke out in a warehouse in a residential building in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग