शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आमदाराला चोराकडून ‘धडा’, ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे ७५ हजारांचे पाकीट जल्लोषावेळी लांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 10:01 IST

Dyaneshwar Mhatre: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप-शिवसेना युतीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमाराने चक्क विजयी उमेदवाराचेच पाकीट मारले.

अंबरनाथ : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप-शिवसेना युतीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमाराने चक्क विजयी उमेदवाराचेच पाकीट मारले. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पोलिसांकडे याबाबत तोंडी तक्रार केली आहे.

गुरुवारी नेरूळ येथील मतमोजणी केंद्रावर म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात होता. या जल्लोषात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने गर्दीचा फायदा घेत पाकिटमाराने अनेक कार्यकर्ते-पदाधिकारी यांची पाकिटे लंपास केली. काहींचे मोबाइल चोरट्याने लंपास केले. या चोरट्याची भूक येथेच भागली नाही. त्याने थेट विजयी उमेदवाराच्या खिशातच हात घातला. म्हात्रे यांच्या पुढच्या खिशातील ५० हजार रुपये आणि मागच्या पर्समधील २५ हजार रुपये अशा एकूण ७५ हजारांवर चोरट्याने डल्ला मारला. आपले पाकीट मारले गेल्याचे म्हात्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. विजयाच्या जल्लोषात पाकीटमार सहभागी झाल्याने एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

  या आधीदेखील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मंत्रिपदाच्या जल्लोषा दरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पत्रकारांचे मोबाइल आणि पाकिटे लंपास केली गेली होती.  रॅली, जल्लोष आणि जाहीर सभेदरम्यान पाकीट मारायच्या ज्या घटना घडल्या आहेत याबाबतच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. मात्र या चोरट्यांचा अद्यापही शोध घेण्यात आलेला नाही.  असाच काहीसा प्रकार गेल्या महिन्यात मुरबाडच्या म्हसा यात्रेत घडला असून अनेकांचे पाकीट मारण्याचे काम चोरट्यांनी केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे