शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

स्मार्टफोन आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर कायदेशीर बंदी आणावी; भालचंद्र नेमाडे स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 21:42 IST

स्मार्टफोनमुळे मेंदुचा एकच भाग काम करतो हे न्युरोलॉजिस्टनं देखील सिद्ध केलं आहे. तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचं प्रमाण आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत भयंकर आहे.

ठाणे- 

स्मार्टफोनमुळे मेंदुचा एकच भाग काम करतो हे न्युरोलॉजिस्टनं देखील सिद्ध केलं आहे. तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचं प्रमाण आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत भयंकर आहे. या दोन्ही गोष्टी चुकीच्या असून सरकारनं कायदेशीररित्या यावर बंदी घातली माहिती, असं रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं आहे. ते 'लोकमत' आयोजित 'साहित्य पुरस्कार २०२३' सोहळ्यात बोलत होते. 

धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!

साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी नेमाडे यांची छोटेखानी मुलाखत देखील घेण्यात आली.

नेमाडे यांनी यावेळी स्मार्टफोन आणि इंग्रजी भाषेच्या वाढलेलं प्रस्थ यावर आपलं मत व्यक्त केलं. "युरोपात आता मोबाइलवर बंदी आणायचं चाललं आहे. मोबाइलमुळे मेंदुतील ५०-६० सेंटर्स असतात त्यापैकी फक्त एकच सेंटर काम करतं. तुमच्या मेंदुचा एकच भाग काम करतो. मोबाइल तुम्ही वापरू लागलात की तुमचं एकच सेंटर काम करतं हे न्युरोलॉजिस्टनंही सिद्ध केलं आहे. त्यामुळे कायदेशीररित्या मोबाइलवर बंदी घातली गेली पाहिजे", असं नेमाडे म्हणाले. 

इंग्रजी मीडियम शाळांवर बंदी आणाज्या पद्धतीनं स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालण्याची गरज आहे तशीच गरज आज देशात इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही घातली गेली पाहिजे असं मत नेमाडे यांनी व्यक्त केलं. "कोरिया, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी हे कुणीच इंग्रीज शिकवत नाहीत. तिथं दोन-चार लोक इंग्रजी शिकून घेतात. पण आपल्या देशात ४०-५० टक्के लोक इंग्रजी शिकतात. इंग्रजी मीडियममध्ये शिकतात हे चुकीचं आहे. तसंच ७०-८० टक्के लोक मोबाइल वापरू लागले हे चुकीचं आहे. हे कायद्यानेच बंद करण्याची परिस्थीती आज आहे. शेवटी सरकार कशासाठी आहे", असा सवाल उपस्थित करत नेमाडे यांनी इंग्रजी मीडियम शाळांबाबत आपलं मत व्यक्त केलं.