शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गवर लुटणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला अटक

By धीरज परब | Updated: December 11, 2023 20:56 IST

रिक्षा चालकांच्या टोळीने गोस्वामी यांचे लुटले दागिने हस्तगत करण्यासह त्यांनी आणखी असे गुन्हे केल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत . 

मीरारोड - काशीमीरा महामार्गावर गुजरातच्या एका व्यक्तीस लुटणाऱ्या रिक्षा चालकांच्या तीन जणांच्या टोळीला काशीमीरा  पोलिसांनी अटक केली आहे. 

गुजरातच्या अहमदाबाद मधील वृंदावन वाटिका मध्ये राहणारे  जिग्नेश गोस्वामी ( ३५ ) हे काशीमीरा भागात थांबले होते . ९ डिसेम्बरच्या रात्री पावणे अकराच्या सुमारास ते प्रदीप उर्फ पन्नू दिलीप सवादकर ( २९ ) रा . हनुमान मंदिर जवळ , पेणकरपाडा , मीरारोड यांच्या रिक्षातून अजित पॅलेस ते सरोजा लॉज कडे जात होते . 

रिक्षा चालक  सवादकर ह्याने सरोजा लॉज कडे रिक्षा न नेता ती थेट काशीमीरा उड्डाणपूल वर नेली . त्याचवेळी अचानक फिल्मी स्टाईलने दुचाकी वरून आलेल्या  जियाउल्ला उर्फ सोनू निजात खान ( २६ ) रा . के . एन . शेख कंपाऊंड , केतकी पाडा , दहिसर   व  अर्शद बासिद खान ( ३८ ) रा . गणेश मंदिर जवळ ,  मीरागाव , दोघांनी रिक्षाच्या समोर दुचाकी आडवी घालून रिक्षा अडवली .

रिक्षात बसलेल्या गोस्वामी यांना तुम्ही ड्रग्ज घेऊन जात आहात असे सांगून त्यांच्या कडील सोन्याची आंगठी , ब्रेसलेट , चैन असे १ लाख ५ हजारांचे दागिने बळजबरीने लुटून ते दुचाकीस्वार व रिक्षा चालक पसार झाले . त्या झटापटीत चैनच एक तुकडा रिक्षात पडला . १० डिसेम्बर रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . जबरी लुटीच्या ह्या घटनेचे गांभीर्य पाहून उपायुक्त जयंत बजबळे  यांनी लुटारूंना तातडीने पकडण्याचे निर्देश दिले होते .  

पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक शिवाजी खाडे व पोलीस पथकाने या प्रकरणी तपास सुरु केला . पोलिसांनी  या प्रकरणी १० डिसेम्बरच्या मध्यरात्री मीरारोड ह्या तिघा रिक्षा चालकांना अटक केली आहे . सोमवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत . ह्या लुटारू रिक्षा चालकांच्या टोळीने गोस्वामी यांचे लुटले दागिने हस्तगत करण्यासह त्यांनी आणखी असे गुन्हे केल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत . 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी