शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर विवस्त्र करीत अल्पवयीन मुलीवर मित्राचा बलात्कार

By जितेंद्र कालेकर | Updated: February 10, 2024 08:58 IST

व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी; आरोपीला अटक

ठाणे : गप्पा मारण्याच्या बहाण्याने उपवन येथील एका लॉजवर १६ वर्षीय मुलीला नेल्यानंतर तिला जबरदस्तीने विवस्त्र करून तिचा व्हिडीओ मोबाइलमध्ये काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आवेज खाजा पठाण (२१, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी दिली. तिने या प्रकाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या बालमनाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी मैत्री करण्यासाठी आवेज हा नेहमी तिचा पाठलाग करीत होता. तिला जाळ्यात ओढून नाश्ता करण्याच्या बहाण्याने उपवन येथील एका लॉजवर नेले. आवेजने चाकूच्या धाकावर तिला जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पाडले. ती विवस्त्र असताना मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढून ते तिच्या आई- वडिलांना दाखविण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. उपवन येथील श्लोक लॉज आणि टिकूजिनीवाडीजवळील जंगलात जबरदस्तीने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही घटना तिने तिच्या मानलेल्या भावाला सांगितल्याचा राग मनात धरून तिला ६ फेब्रुवारी २०२४ राेजी लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार फेब्रुवारी २०२२ ते ६ फेब्रुवारी २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये घडला. या सर्वच प्रकाराला कंटाळून तिने अखेर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने उपचारासाठी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या पथकाने आवेज पठाण याला गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून बेल्ट आणि चाकू जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक अनिल शेळके हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस