शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विचित्र अपघात; पाच वाहने एकमेकांवर आदळली, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:50 IST

अपघातामुळे मुंबई नाशिक मार्गावर वाहतूक कोंडी: कोरम मॉल ते नितीन कंपनी वाहनांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: मुंबई - नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावर नाशिककडे जाणाºया मार्गावर माजीवडा उड्डाणपूलावर गुरुवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास एकमेकांवर आदळून पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वेगवेगळ्या दोन वाहनांमधील भरत चव्हाण (४७) आणि दीपक सिंग (३५) हे दोन चालक गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे एक तासांपेक्षा अधिक काळ या मार्गावरील वाहतूक मोठया प्रमाणात खोळंबली होती. त्यामुळे विवियाना मॉल ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर ही वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईकडून नाशिककडे जाणाºया मार्गावर पाच वाहनांचा एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला असून यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती एका नागरिकाने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी राबोडी पोलिसांसह कापूरबावडी वाहतूक विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या अपघातामध्ये दोन वेगवेगळया वाहनांमधील जखमी झालेल्या चव्हाण सिंग (३५) या दोन चालकांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये चव्हाण यांच्या डोक्याला, छातीला आणि पायाला तर सिंग यांच्याही डोक्याला, पायाला, हाताला आणि चेहºयावर गंभीर दुखापत झाली.

या अपघातात चार वाहने मुंबईकडून भिवंडी आणि माणकोली तर एक वाहन ठाण्याच्या वागळे इस्टेट येथून भिवंडी कडे जात होते. मुंबईकडून नाशिककडे जाणाºया माजिवाडा पूलावर हा अपघात झाला. त्यामुळे या मार्गावर वाहतूक शाखेने सुमारे तासभर वाहतूक बंद केली होती. घटनास्थळी अपघातग्रस्त पाच वाहने टोविंग व्हॅनच्या मदतीने ब्रिजवरून अन्यत्र हलविण्यात आली. त्यानंतर मुंबई नाशिक मार्ग दुपारी ३.१५ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाºयांनी दिली. 

टॅग्स :Accidentअपघात