उल्हासनगर : व्यापारी महामंडळाने आयोजित केलेल्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर सत्कार कार्यक्रमात स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी व ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम, मनोज लासी यांच्या खडाजंगी झाली. अखेर माजी आमदार पप्पू कलानी यांनी हस्तक्षेप करीत राजकीय भाष्य न करता शहर हितावर सर्वांना बोलण्यास सांगितले.
उल्हासनगर महापालिका निवकणुकीत परस्परा विरोधात लढलेले भाजपा व शिंदेसेना, ओमी टीमचे स्थानिक नेते महापालिका सत्तेसाठी एकत्र आले. मात्र एकमेका विरोधात बोलण्याची एकही संधी दोन्हीकडील नेते गमावित नाही. कॅम्प नं-५ मधील व्यापारी संघटनेने नवनिर्वाचित महापौर अश्विनी निकम व उपमहापौर अमर लुंड यांच्या सत्कारासाठी मंगळवारी संध्याकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड यांच्यासह माजी आमदार पप्पू कलानी, ओमी टीमचे प्रवक्ता, माजी नगरसेवक मनोज लासी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह अनेक नगरसेवक व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम, मनोज लासी यांनी स्वीकृत नगरसेवक पदावरून भाजपा नेत्यांना डिचाविले. त्याला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी ओमी टीमच्या नेत्यांना उत्तर दिले. तसेच भाजपचे माजी अध्यक्ष व निवडणूक प्रभारी प्रदीप रामचंदानी यांनीही तीच री ओढत भाषण सुरू केले. महापौर व उपमहापौर सत्कार कार्यक्रमात भाजपा व ओमी टीम नेत्याच्या या शाब्दिक हल्ले सुरू होते. कार्यक्रमाचे भान राखून अखेर माजी आमदार पप्पू कलानी यांनी रामचंदानी यांचे भाषण थांबवीत आपण सर्वांनी शहर विकासावर बोलावे अशी विनंती केली. कलानी यांच्या हस्तक्षेपानंतर रामचंदानी यांनीही मोठे मन दाखवित शहर विकासावर भाषण सुरू केले. एकूणच सत्तेसाठी एकत्र आलेले भाजपा व ओमी टीम नेते मनाने एकत्र आले नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.
Web Summary : At an Ulhasnagar event, BJP and Omi Team leaders clashed over councilor selections. Pappu Kalani intervened, urging focus on city development. The event exposed underlying tensions despite their coalition.
Web Summary : उल्हासनगर में एक कार्यक्रम में भाजपा और ओमी टीम के नेता पार्षद चयन पर भिड़ गए। पप्पू कलानी ने हस्तक्षेप करते हुए शहर के विकास पर ध्यान केंद्रित करने का आग्रह किया। घटना ने उनके गठबंधन के बावजूद अंतर्निहित तनावों को उजागर किया।