शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

मृत्यू समोर दिसत असतानाही सोडली नाही पतीची साथ; 'आधुनिक सावित्री'चं बलिदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 18:24 IST

अंबरनाथच्या बारकू पाड्यात राहणारे वासुदेव रघुनाथ भोईर आणि गुलाबबाई वासुदेव भोईर हे वृद्ध दाम्पत्य बुधवारी दुपारी डोंबिवलीला राहणाऱ्या आपल्या मुलीकडे रिक्षेनं निघाले होते.

पंकज पाटील

अंबरनाथ : गंधकानं भरलेल्या पेटत्या ट्रकच्या धडकेत रिक्षा जळून खाक झाल्याची घटना बुधवारी अंबरनाथमध्ये घडली होती. या घटनेत रिक्षेतील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रिक्षेतील दाम्पत्यापैकी पत्नीला रिक्षेबाहेर उडी मारणं सहज शक्य होतं. मात्र मृत्यू समोर दिसत असतानाही तिनं पतीची साथ न सोडता बलिदान दिलं. या आधुनिक सावित्रीच्या बलिदानाची गोष्ट ऐकून सध्या अंबरनाथकर हळहळतायत.

अंबरनाथच्या बारकू पाड्यात राहणारे वासुदेव रघुनाथ भोईर आणि गुलाबबाई वासुदेव भोईर हे वृद्ध दाम्पत्य बुधवारी दुपारी डोंबिवलीला राहणाऱ्या आपल्या मुलीकडे रिक्षेनं निघाले होते. त्याच परिसरात राहणाऱ्या राजेश यादव याच्या रिक्षेत हे दाम्पत्य दुपारी पावणेतीनच्या सुमारास घरून निघालं. त्यांची रिक्षा आनंदनगर पोलीस चौकीच्या पुढे वालधुनी नदीच्या पुलावर आली असता समोरून एक पेटलेला ट्रक त्यांना रिक्षेच्या दिशेनं उलटा येताना दिसला. त्यामुळं वासुदेव यांनी रिक्षाचालक राजेश याला रिक्षेतून उडी मारण्यास सांगितलं. वासुदेव भोईर यांना पायाला इजा असल्यानं आधाराशिवाय ते नीट चालूही शकत नव्हते. त्यामुळं त्यांना रिक्षेतून उडी मारणं शक्य झालं नाही. त्याचवेळी त्यांच्या पत्नी गुलाबबाई भोईर या मात्र सहजपणे रिक्षेतून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवू शकल्या असत्या. मात्र समोर मृत्यू दिसत असतानाही त्यांनी पतीची साथ सोडली नाही आणि पतीसोबत बलिदान दिलं. रिक्षाचालक राजेश याच्या समोरच पेटत्या ट्रकनं रिक्षेला धडक देत रिक्षेचा चक्काचूर केला आणि रिक्षेलाही आगीच्या ज्वाळांनी वेढलं. लहानपणापासून वासुदेव भोईर यांच्याच बाजूला राहणाऱ्या राजेश याचे अपघाताचं दृश्य आठवताना आजही अश्रू थांबत नाहीत.

आई बाबांच्या या अपघाताबाबत मृत वासुदेव भोईर यांचा मुलगा मयूर याला विचारलं असता, आईबाबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. बाबांना शारीरिक व्याधींमुळे चालता येत नव्हतं, मात्र आईला त्यावेळी सहज रिक्षातून उडी मारता आली असती. मात्र तरीही तिनं बाबांची साथ सोडली नाही, असं त्यानं सांगितलं.

सर्वात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही रिक्षा आग विझवल्यानंतर बाहेर काढण्यात आली, त्यावेळी वासुदेव आणि गुलाबबाई यांचे मृतदेह एकमेकांना कवटाळून बसलेल्या अवस्थेत बाहेर काढले गेले. मृतदेह वेगळे होत नसल्यानं ते तशाच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजात मात्र मोठी कालवाकालव झाली. त्यामुळं अखेरच्या क्षणीसुद्धा पतीची साथ न सोडणाऱ्या गुलाबबाई यांना खरोखर या आधुनिक सावित्री म्हणावं लागेल.