ठाणे: वंदना एसटी डेपोसमोरील एव्हर ग्रीन सोसायटीच्या आवारात असलेल्या एका विहिरीमध्ये मांजर पडली होती. तिची ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरुप सुटका केल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.
ठाण्यातील वंदना सिनेमाच्या बाजूला आणि वंदना डेपो समोरील या विहिरीमध्ये एक मांजर पडल्याची घटना २८ एप्रिल रोजी दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास घडली. ही माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी या मांजरीची अवघ्या काही वेळातच सुखरुप सुटका केली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.