शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा जयघोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; असा गुन्हा आपणही करणार - जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Updated: February 23, 2023 17:29 IST

पोलिसांनी गुन्हा विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी दाखल केल्याचे म्हटले आहे...

ठाणे : शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा जयघोष करणाऱ्या दोन तरुणांवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून," असा गुन्हा आपणही करू," असे ट्वीट केले आहे. मात्र कळवा पोलिसांनी गुन्हा विनापरवानगी रॅली ढल्याप्रकरणी दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे.

      १९ फेब्रुवारी रोजी कळवा परिसरात मोठ्या उत्साहात छत्रपती  शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भीम नगर येथे राहणारे तुळशीराम साळवे आणि भीमा साळवे यांनी कळवा नाका येथे दुचाकीवरून जाताना तसेच शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात"छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचा ठपका ठेऊन या दोघांवर भादंवि ३७(1) (३), १३५,अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे. ""छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी घोषणा शिवरायांच्या जयंतीलाच देणे, हा जर गुन्हा असेल तर मी पण असा गुन्हा करणार!  "छत्रपती शिवाजी महाराज की जय" ही घोषणा मनामनात आणि मुखामुखात आहे.  पोलीस जर अशी अतिरेकी कारवाई करणार असेल आणि शिवरायांवरील प्रेमापासून रोखणार असेल तर ते चालणार नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आम्ही या अतिरेकी कारवाईस प्रत्युत्तर देणार!!" छत्रपती शिवाजी महाराज की जय" असे ट्वीट डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिस