शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! बदलापुरातील 'त्या' दोन कार्यकर्त्या महिलांवरच गुन्हा दाखल; तोडफोड करणाऱ्यांच्या यादीत नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:21 IST

शाळा, पोलिसांच्या दबावाला बळी न पडता मुलींचे पालक गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. 

लोकमत न्यूज नेटवर्क  बदलापूर : मुलींवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुलींच्या पालकांना मदत करणाऱ्या दोन महिला सामाजिक कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी  आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने संताप व्यक्त होत आहे. या दोन महिला कार्यकर्त्यांवर शाळेत तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

लैंगिक अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा पोलिस आणि शाळा व्यवस्थापनाचा प्रयत्न होता. मात्र, दबावाला न जुमानता पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे संपूर्ण देशाला हादरवरून टाकणारा हा गुन्हा उघडकीस आला.  शाळेत अत्याचाराची घटना घडल्यानंतर पालकांनाही घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शाळा, पोलिसांच्या दबावाला बळी न पडता मुलींचे पालक गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. 

नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणारे पोलिसच या प्रकरणात कच खात होते. त्यामुळे या प्रकरणात  गुन्हा दाखल व्हावा म्हणून मनसेच्या स्थानिक नेत्या संगीता चेंदवणकर यांनी मोलाचा वाटा उचलला. पीडित मुलीला त्यांनीच धीर दिला. तसेच पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.

...अन्यथा हा गुन्हा दडपला असता गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिस संथपणे चौकशी करीत होते. संगीता चेंदवणकर यांच्या मदतीला मग इतर महिला कार्यकर्त्याही पुढे सरसावल्या होत्या. त्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्या तरी त्यांनी आपला पक्ष बाजूला ठेवला आणि घडलेल्या प्रकाराविरोधात बदलापूरकरांना संघटित केले होते. प्रियांका दामले यांनीही या प्रकरणात प्रशासनाला धारेवर धरले होते. संगीत चेंदवणकर आणि प्रियांका दामले यांच्यामुळेच बदलापूरकर रस्त्यावर उतरले. ते उतरले नसते तर हा गुन्हा दडपला गेला असता, असे म्हटले जाते. 

चेंदवणकर, दामलेंवरील गुन्हा मागे घ्या पोलिस पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत करीत नव्हते. त्यावेळी संगीता चेंदवणकर आणि प्रियांका दामले या दोन कार्यकर्त्या त्यांच्यामागे भक्कमपणे उभ्या राहिल्या होत्या. या दोघींवर शाळेत तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूर