शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पोलीस भरतीसाठी उमेदवाराने घेतले उत्तेजक द्रव्य; भरतीमधून केले अपात्र 

By जितेंद्र कालेकर | Updated: January 12, 2023 23:02 IST

त्याची वैैद्यकीय तपासणीही केली असून अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे : पोलिस भरतीसाठी इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य घेऊन धावण्याच्या चाचणीमध्ये भाग घेणाऱ्या औरंगाबादच्या एका २२ वर्षीय तरुणाला गुरुवारी बाद  केल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. त्याची वैैद्यकीय तपासणीही केली असून अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे शहर आयुक्तालयाच्या ५२१ जागांसाठी सध्या साकेत येथील पोलिस कवायत मैैदानावर उमेदवारांची शारिरिक आणि मैैदानी चाचणी घेतली जात आहे. १२ जानेवारी रोजी दुपारी औरंगाबादच्या या उमेदवाराची कागदपत्रे पडताळणीनंतर छाती आणि उंची तपासण्यात आली. यात पात्र ठरल्यानंतर गोळा फेक आणि १०० मीटर धावण्याच्या चाचणीमध्येही त्याने भाग घेतला. त्यानंतर त्याच्यासह अन्य उमेदवारांना एका व्हॅनमधून १६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी नेले जात असतांना दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास त्याने इंजेक्शनद्वारे एक उत्तेजक द्रव्य घेतल्याचे आढळले. ते घेतल्याची माहिती भरतीसाठी त्याच्याबरोबर असलेल्या अन्य उमेदवारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. त्याच्याकडून हे इंजेक्शन जप्त केले असून त्याची तातडीने वैैद्यकीय चाचणी केल्याची माहिती राबोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस संतोष घाटेकर यांनी दिली. त्याच्याकडे या इंजेक्शनबाबत चौकशी करण्यात येत असून रासायनिक विश्लेषकांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी, नांदेडमध्ये आॅक्सी बूस्ट हे इंजेक्शन घेतांना उमेदवाराला पकडण्यात आले. तर रायगडमध्येही असेच उत्तेजक द्रव्य एकाने घेतल्याचे आढळले. आता ठाण्यात तर अ‍ॅन्टी डोपिंग पथकाची निर्मिती होऊनही उमेदवाराने उत्तेजक द्रव्य घेतल्याचे आढळल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.‘‘औरंगाबादच्या उमेदवाराने उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचे आढळले. रासायनिक विश्लेषकांच्या अहवालानंतर यावर पुढील कार्यवाही केली जाईल. तूर्त त्याला भरती प्रक्रीयेतून बाद केले आहे.’’गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद