शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पोटातून काढला १० किलोंचा पाण्याचा गोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:19 IST

Thane: सर्वसामान्य रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर देवदूत ठरत आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एका महिलेच्या पोटातून दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा काढण्यात आला. सुमारे १२० मिनिटांच्या प्रयत्नांअंती हा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

ठाणे - सर्वसामान्य रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर देवदूत ठरत आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एका महिलेच्या पोटातून दहा किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा काढण्यात आला. सुमारे १२० मिनिटांच्या प्रयत्नांअंती हा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

उल्हासनगर  परिसरात भाजी विकणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दुखत होते. परिस्थिती सामान्य असल्यामुळे खासगी रुग्णालयात पोटाची तपासणी करायची कशी, असा प्रश्न तिच्या कुटुंबाला होता. त्यामुळे दुखण्याकडे तिने दुर्लक्ष केले. मात्र, त्रास जास्त होऊ लागल्याने तिला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी तिला सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पोटातून पाण्याने भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढण्यात आल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके यांनी दिली.

महिलांच्या पोटात मांसाचा गोळा शरीरातील काही बदलामुळे होतो. पोटात सारखे दुखणे, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास इत्यादी लक्षणे आढळतात. काहीवेळा हा गोळा कर्करोगाचाही असू शकतो. त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवला आहे.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :Healthआरोग्यthaneठाणे